पुणे- स्वतः लोकप्रतिनिधी असताना घरातले नातलग हि नगरसेवक व्हावेत .. अशी इछ्या का असावी ? घरातले सारेच जनसेवक झाले तर ..खरा ओरीजनल पोटापाण्याचा धंदा कोण चालविणार ? का राजकारण हाच एक धंदा करून ठेवणार ? असे अनेक प्रश्न सामान्य बिनअभ्यासू मतदाराच्या मनात घोळत असताना अनेक लोकप्रतिनिधींनी जणू घरदारालाच महापालिकेत नेवून बसविण्याचा घाट घातला आहे. अर्थात ते लोकसेवेला वाहून घेणार असतील तर हरकत कोणीच घेणार नाही .
भाजपमधील आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना, तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू, विद्यमान नगरसेवक सुनील कांबळे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. आमदार माधुरी मिसाळ यांची नणंद, विद्यमान नगरसेविका मानसी देशपांडे यांनाही उमेदवारी देण्यात आली असून, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांचा पुतण्या अभिषेक यांना तसेच वहिनी, विद्यमान नगरसेविका वर्षां यांना प्रभाग क्रमांक ३९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.म्हणजे आता तापकीरांच्या घरातील ३ जण लोकप्रतिनिधी होण्याच्या मार्गावर आहेत … पक्षाने उमेदवारी दिली आहे कोणाची हरकत असण्याचे कारण नाही, विद्यमान नगरसेवक विष्णू हरिहर यांना उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी त्यांची पत्नी कांचन यांना प्रभाग क्रमांक १८ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या बारा विद्यमान नगरसेवकांपैकी अकरा नगरसेवकांना शिवाय त्यांच्या नातेवाइकांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरही पक्षाने विश्वास टाकला आहे. मात्र त्यासाठी भाजपच्या चौदा विद्यमान नगरसेवकांचा बळी पक्षाने दिला आहे.महापालिका निवडणुकीसाठीची भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री उशिरा माध्यमांकडेपाठविण्यास सुरुवात झाली. निवडणुकीसाठी पक्षाने विद्यमान नगरसेवकांना संधी नाकारली असल्याची चर्चा पक्षामध्ये काही दिवसांपासून सुरू होती. या चर्चेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सुनीता गलांडे, शीतल सावंत, प्रकाश ढोरे, बापूराव कर्णे-गुरुजी, राजाभाऊ लायगुडे, राजाभाऊ बराटे, अनिल टिंगरे आणि अभिजित कदम या नगरसेवकांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांची पत्नी रेश्मा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास बाकी असताना त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. तर कर्णेगुरुजी यांनाही शेवटच्या काही तासात उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश धाडवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यांची पत्नी रूपाली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर माजी उमपहापौर प्रसन्न जगताप, हरिदास चरवड, मनसेच्या माजी नगरसेविका कल्पना बहिरट, सम्राट थोरात, दिलीप वेडे-पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र एंडल यांच्यासह हडपसर, कोथरूड, पाषाण, कात्रज या भागातून पक्षात आलेल्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे यांना टोलवले आहे. पक्षात प्रवेश केलेले बाकी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यांना शंभर टक्के संधी देण्यात आली आहे.