Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करा: पराग करंदीकर

Date:

पुणे- सन 2017 च्या  निवडणुकीत 82 हा आकडा गाठणे आवश्यक असून भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करा असा सल्ला महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी येथे  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत  ‘दै. महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.
 पराग करंदीकर बोलताना म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘लक्ष्य 2017’ साठी 82 हा आकडा येत्या निवडणुकीत गाठायचा आहे. त्यासाठी पुणे शहरात पोषक वातावरण आहे का हे प्रथम पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या कोणत्या उणीवा आहेत त्या कार्यकर्त्यांना ओळखता आल्या पाहिजे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी कचरा, रस्त्यावरील खड्डे, वीज, पाणी या चार समस्या महत्वाच्या असतात. पुणे महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेला नगरसेवक पाच वर्षातील विकासकामे कश्याप्रकारे करून मतदारांना सामोरे जातो, आपल्या प्रभागात कोणकोणते सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रम राबवितो याकडे नागरिकांचे लक्ष असते.  तुमच्या मतदारसंघाबाबत तुम्ही कीती जागरूक आहात या सर्व गोष्टीं अतिशय महत्वाच्या आहेत.
भाजपला  किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करावा. जे मतदारांपर्यंत पोहचू शकत नव्हते ते त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पोचले. पुढील निवडणुक ही याच पध्द्तीची असणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यत तुम्ही केलेली कामे पोहोचविणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन 10 वर्षात केलेल्या कामाचे अहवाल दिले पाहिजे.त्यांना त्या कामाचे तपशील देता आले पाहिजे.
सोशल मिडीया, वैयक्तिक संपर्क, कार्यकर्त्यांची फळी, आपण केलेली कामे, समन्वय, नियोजन हे खूप गरजेचे आहे. हे शक्य झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला 82 हा आकडा गाठणे शक्य आहे. त्यासाठी आत्तापासून कामाला सुरुवात करा.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...