पुणे, :- 25 सप्टेंबर, 2016 (रविवार) रोजी मराठा समाजाच्यावतीने शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठया प्रमाणावर नागरीक सहभागी होणार असल्यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 25 सप्टेंबर, 2016 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्यसेवा (मुख्य) परिक्षा 24 ते 26 सप्टेंबर,2016 रोजी आयोजित करण्यात आली आहे. नागनाथ मारुती गडसिंग गुरुजी ज्युनि कॉलेज, कृष्णनगर, चिंचवड, पुणे-19 आणि मुलींचे आगरकर हायस्कुल,442,सोमवार पेठ,पुणे-11 या शाळांमध्ये परिक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस दलातर्फे वाहतूकीचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. परिक्षार्थींनी परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी साधारण एक तास अगोदर पोहचावे. वाहतूक खोळंबल्यामुळे परिक्षार्थीना परिक्षेस मुकावे लागु नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व परिक्षार्थीना आवाहन करण्यात आले आहे.