41 लाखांच्या वीजबिलांचे 18 लाख भरून 10 कृषी ग्राहक थकबाकीमुक्त

Date:

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2021:कृषिपंपाच्या वीजबिलांपोटी 41 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी असताना कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत उरळी कांचन परिसरातील 10 कृषी ग्राहकांनी 18 लाख 50 हजार रुपयांचा भरणा करून सोमवारी (दि. 15) थकबाकीमुक्ती मिळविली आहे.

पुणे परिमंडलात कृषीपंपधारक शेतकरी व कृषी ग्राहकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी व्याज, विलंब आकारात तसेच मूळ थकबाकीमध्ये 50 टक्केपर्यंत माफी देणाऱ्या योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरु झालेली आहे. मुळशी विभाग अंतर्गत उरळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा या गावांतील 10 कृषिपंपधारक शेतकरी व कृषीग्राहकांकडे वीजबिलांपोटी सुमारे 41 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी होती. थकबाकीमुक्तीच्या योजनेतील सवलतीप्रमाणे या ग्राहकांनी सोमवारी (दि. 15) 18 लाख 50 हजार रुपयांचे धनादेश उरळीकांचन कार्यालयात जमा केले. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता श्री. तालेवार यांच्याहस्ते थकबाकीमुक्त झालेल्या कृषी ग्राहकांचा गौरव करण्यात आला. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसोबतच गाव व जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या विकासाला वेग देणारी ही ऐतिहासिक योजना आहे. त्याचा सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. तालेवार यांनी केले.

कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, के. डी. बापू कांचन, चंद्रलेखा रामराव जगताप, बापू घुले, श्रीदत्त सहकारी पाणीपुरवठा, म्हातोबा गौतम सहकारी पाणीपुरवठा योजनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. भरणा केलेल्या वीजबिलाच्या रकमेतील 33 टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्र व 33 टक्के रक्कम जिल्हा क्षेत्रातील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांच्या थकीत वीजबिलातील विलंब आकार, व्याज व मूळ थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंत माफी मिळत असल्यामुळे या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...