राज्यात ब्रिटीश राज -खासदार सुप्रिया सुळे

Date:

म्हणाल्या ,’छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी राजेंचा अवमान करून बक्कळ कमाई करण्याच्या प्रयत्नांना पायबंद न घालता अशा संधी साधू निर्माते दिग्दर्शकांना संरक्षण देत त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक करणे म्हणजे राज्यात लोकशाही चे किंवा भाजपाचे राज्य नसून ब्रिटीश राज असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरु केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक करणे म्हणजे राज्यात ब्रिटीश आले आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जात आहे. जितेंद्र आव्हाड हे लढवय्या नेते आहे. प्रश्न विचारण्यासाठी त्यांना ठाण्यात बोलाविले. नंतर असे कळले की, वरुन दबाब येत आहे तो कुणाचा हे माहित नाही. यात पोलिसांची काहीच चूक नाही. कारण त्यांना त्यांचे काम करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवत असेल आणि मनापासून कुणाला वेदना होत असेल तर त्यांनी आंदोलन करणे चुकीचे नाही. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.

अटक करणे चूक – रोहीत पवार

रोहीत पवार म्हणाले, माॅलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना अडचण येऊ नये म्हणून मदत करीत होते. सरकारनेच हर हर महादेव चित्रपट बंद करायला हवा होता. परंतू ते शांत आहेत. आव्हाड छत्रपतींच्या चुकीच्या इतिहासाविरोधत लढत असताना त्यांना अटक करीत असाल तर ते चुकीचे आहे. महाराजांबाबत चुकीचा इतिहास दाखवला तर आव्हाड गप्प बसणार नाही हे म्हटलेच होते. भाजप नेते नरेंद्र दाभोळकर यांच्या कर्मभूमीत जाऊन अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या गोष्टी बोलतात, शिंदे गटाचे लोक गोळीबार करतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची ईच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू शिवाजी महाराजांविरोधात लढले हे वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत ईतिहास दाखवला जात आहे.

ऐतिहासिक संदर्भ नाहीत

आव्हाड म्हणाले, सर्वांची जबाबदारी आम्हीच घेतली असे नाही जिथे – तिथे शो बंद पाडावे. आमच्या माध्यमातून संदेश राज्यात गेला. गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा कसा असेल, मला सांगा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. काही मुद्द्यांवर ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात नाही, जे घडलेच नाही कुणी वाचलेच नाही ते चित्रपटात दाखवले गेले.

यावर आव्हाडांचा आक्षेप

  • जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
  • रघूनाथाला हनुमान तसा शिवाजीला बाजीप्रभू असे लिहीले ते तसे नाही ती वाक्यरचना वेगळी आहे.
  • मावळे दणकट असावे, देहसौंदर्य दाखवताना आपण ती भूमिका कुणाला साकारलायला देत आहोत. मेसेज काय जातोय. मावळे लुळे, पेंगळे का दाखवले गेले.
  • अक्षय कुमारला विरोध नाही, पण महाराजांच्या लढाया सोळा ते छेचाळीस या वयात झाल्या, त्या वयात अक्षयकुमार बसत नाही.कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचे मुंडके उडवले हे स्पष्ट असतानाही विकृती दाखवली जात आहे.
  • शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे मग विकृती दाखवली जात आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिवाळ्यासाठी एअर इंडियाने कॅनडाच्या उड्डाणात केली वाढ, मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन विमानसेवा सुरू; तर दिल्ली-टोरंटो मार्गावर अगदी नवीन B787-9 विमानांची उड्डाणे

सुधारित केबिन इंटिरिअर्ससह मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन हंगामी सेवा दिल्ली-टोरंटो विमानांमध्ये नवीन केबिन सुविधा जानेवारी 2027 पासून टोरंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित सुविधांचा वापर या हिवाळ्यात मुंबई-टोरंटो विमानसेवा चालवणारी एकमेव विमान कंपनी उच्च-गुणवत्तेचे व्हिज्युअल साहित्य येथे उपलब्ध: https://we.tl/t-GFxaVvkCxaByGoai गुरुग्राम, 01 ऑगस्ट 2026: दिल्ली-टोरंटो मार्गावर एअर इंडियाने आपले अगदी नवीन B787-9 विमान आज सेवेत रुजू केले. यामुळे एअरलाइनची अद्ययावत केबिन सुविधा आणि प्रवासादरम्यानचा उत्कृष्ट अनुभव पहिल्यांदाच कॅनडापर्यंत पोहोचणार असून, प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधारित, एअर इंडियाने 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी कॅनडातील आपल्या सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: मुंबई आणि टोरंटो दरम्यान नवीन थेट (नॉन-स्टॉप) सेवा भारत आणि कॅनडा दरम्यानच्या एकूण प्रवासी क्षमतेत दरमहा 4,400 जागांची (सीट्सची) वाढ टोरंटोसाठीच्या प्रीमियम श्रेणीतील जागांच्या क्षमतेत 71% वाढ नवीन, हंगामी मुंबई-टोरोंटो सेवा, सुधारित अंतर्गत सजावटीसह 25 ऑक्टोबर 2026 ते 26 मार्च 2027 दरम्यान एअर इंडिया मुंबई आणि टोरोंटो दरम्यान आठवड्यातून तीन वेळा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि कॅनडासाठी दर आठवड्याला जवळपास 2,000 जागांची भर पडेल. तसेच या दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा चालवणारी ही एकमेव विमान कंपनी ठरेल. एअर इंडियाच्या बोईंग 777-300ईआर विमानाद्वारे ही सेवा चालवली जाईल, ज्याच्या केबिनच्या अंतर्गत सजावटीत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हसी स्लाइडिंग डोअर्ससह 8 आलिशान फर्स्ट क्लास स्वीट्स, बिझनेस क्लासमध्ये 40 फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये 280 जागांचा समावेश आहे. मुंबई आणि टोरोंटो दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुधारित B777-300ER विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल. एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली येथील प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून, कॅनडाला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना आणि वडोदरा यांसारख्या अनेक भारतीय शहरांशी सहजपणे जोडले जाणे शक्य होते. जानेवारी 2027 पासून टोरोंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित उत्पादनांचा वापर या हिवाळ्यात एअर इंडियाच्या दिल्ली-टोरोंटो मार्गावरील 10 साप्ताहिक उड्डाणांपैकी, 7 साप्ताहिक सेवा नवीन बोईंग 787-9 विमानांद्वारे चालवल्या जातील, ज्यात एअरलाइनची नवीन केबिन प्रॉडक्ट्स असतील. उर्वरित 3 साप्ताहिक सेवा सुरुवातीला बोईंग 777-300ईआर विमानांद्वारे चालवल्या जातील आणि ताफ्यात अधिक विमाने आल्यावर जानेवारी 2027 पासून त्या नवीन बोईंग 787-9 विमानांमध्ये रूपांतरित होतील. त्यामुळे, टोरोंटोला येणाऱ्या आणि जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांमध्ये पूर्णपणे नवीन किंवा लक्षणीयरित्या सुधारित केबिन इंटिरियर्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना एकसारखा प्रीमियम अनुभव मिळेल. दिल्ली आणि मुंबईहून टोरोंटोसाठी नवीन तसेच अद्ययावत विमाने तैनात केल्यामुळे, एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटो मार्गावरील प्रीमियम श्रेणीतील जागांची क्षमता 71 टक्क्यांनी वाढवणे शक्य झाले आहे; परिणामी प्रवाशांना फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. एअर इंडियाचे मुख्य कमर्शिअल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले: "कॅनडा ही एअर इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. येथील लोकांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ संबंध प्रवासाची मोठी मागणी निर्माण करतात, विशेषतः सणांचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात. या हिवाळ्यात सुरू होणारी आमची हंगामी मुंबई-टोरंटो सेवा प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध करून देईल; हा असा काळ आहे जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला भेटण्यासाठी प्रवास करत असतात. त्याच वेळी, उत्तर अमेरिकेच्या मार्गावर आम्ही आमची अत्याधुनिक विमाने आणि विमानातील अद्ययावत सुविधा टप्प्याटप्प्याने सादर करत आहोत. जगातील सर्वात स्पर्धात्मक अशा लाँग-हॉल अर्थात दीर्घ पल्ल्याच्या बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प यातून सिद्ध होतो. एकत्रितपणे, हे उपक्रम एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा कंपनी बनवण्यासोबतच भारताला जगाशी जोडणारे पसंतीचे माध्यम म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल." टोरोंटोला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांचे वेळापत्रक: उड्डाण #कुठून कुठेप्रस्थानआगमनकिती वेळाविमानAI187दिल्ली-टोरांटो0145 Hrs0930 Hrsदररोजएकदम नवीनB787-9AI188टोरांटो-दिल्ली1230 Hrs1405 Hrs (+1)दररोजAI189दिल्ली-टोरांटो1025 Hrs2135 Hrsबुध, शुक्र, रविB777-300ERAI190टोरांटो-दिल्ली0035...

अमित शाह पुण्यात येणार म्हणून मध्यरात्री काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी

अक्षय जैन यांनी व्यक्त केला संताप पुणे, दि. १ ऑगस्ट...

१८ कथित बोगस अभियंत्यांना पदोन्नतीचे आदेश; ‘आप’चा गंभीर आरोप

उच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला पुणे महापालिका प्रशासनाने...