कसबा विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांना महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रीडा विभागाच्या वतीने कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघातून 6 शहर पदाधिकारी, 4 मतदारसंघ पदाधिकारी व 8 प्रभाग अध्यक्ष यांच्या नेमणुका करण्यात आल्या, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांनी दिली.
यामध्ये शहर उपाध्यक्षपदी-ओम कासार व विशाल कांबळे. शहर सरचिटणीसपदी-संभाजी वाघ, रोहन शिंदे, प्रशांत बरकडे, विनायक राडकर. मतदारसंघ उपाध्यक्षपदी – बाप्पू सोनावणे, रोहन दवे, यतीन खिरापाते. प्रभाग अध्यक्षपदी – यश येनपूरे (प्रभाग क्र. 50), क्षितिज भोसले (प्रभाग क्र. 52), प्रशांत डेंगळे (प्रभाग क्र. 51), न्यामाज साचे (प्रभाग क्र. 65), तेजस परदेशी (प्रभाग क्र. 38), मनोज घोडनदीकर (प्रभाग क्र. 23), मयूर भंडगे (प्रभाग क्र. 59), रोहित भागवत (प्रभाग क्र. 49) आदीची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी उपमहापौर दीपक मानकर आदी उपस्थित होते. मेळाव्याला कसबा विधानसभा मतदारसंघातील 350 कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्ती प्रदान कार्यक्रम आणि मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष विपुल म्हैसूरकर व शहर उपाध्यक्ष ओम कासार यांनी केले होते.
मेळाव्याचे संयोजन संभाजी वाघ, विशाल कांबळे, रोहन शिंदे, प्रशांत बरकडे, बाप्पू सोनावणे, प्रशांत डेंगळे, तेजस परदेशी, न्यामाज साचे, यश यनपुरे, क्षितिज भोसले, रोहन दवे, यतीन खिरापाते, रोहित भागवत, मनोज घोडनदीकर व इतर पदाधिकार्यांनी केले होते.