Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

Date:

पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे आज सकाळी आजारपणामुळे धनकवडी येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.

 

nandu-pol-3_1469689747 YLgKjQPO
श्री गणराय नर्तन करी’ या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती.. ‘सामना’मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर.. ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील राजा.. छोटय़ा पडद्यावरील ‘नाजूका’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला ‘धम्र्या’.. अशा भूमिकांसह गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागविणारा तंत्रज्ञ.. ‘थिएटर अॅकॅडमी’चे एक संस्थापक-सदस्य.. शास्त्रीय संगीताच्या मैफली, जुनी हिंदूी

 

चित्रपटगीते यांविषयी रात्री कट्टय़ावर भरभरून गप्पांचा फड रंगविणारे रसिकराज.. अशा या हरहुन्नरी कलाकाराचा जीवनप्रवासाची आज अखेर झाली
पोळ यांनी घाशीराम कोतवाल, सामना, गाढवाचं लग्न यामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. गेल्या अर्धशतकापासून अधिक काळ चित्रपट, रंगभूमीला मोलाचे योगदान देणारे पोळ यांनी एकाकी घेतलेली ही एक्‍झिट मनाला हुररूर लावून गेली.
नंदू पोळ यांनी  बालवयातच ‘साष्टांग नमस्कार‘ नाटकापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला होता.ते  ध्वनिमुद्रण तंत्रज्ञही होते. त्यासाठी त्यांनी स्वत:चा स्टुडिओ काढला होता.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे ‘मी नंदू पोळ’ या पुस्तकाचे २ मे २०१४  प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले होते .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...