पुणे : चर्होली बुद्गुक (ता. हवेली) येथील दिपाली स्टोन क्रशर या सिमेंटचे ब्लॉक बनविणार्या कारखान्यामध्ये 43,974 युनिटची म्हणजे 6 लाख 1 हजार 410 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 27) स्टोन क्रशरचे प्रोप्रायटर सचिन तानाजी खांदवेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत चर्होली बुद्गुकमध्ये निगुर्डी-लोहगाव रस्त्यावर दिपाली स्टोन क्रशर या कारखान्याला महावितरणने औद्योगिक वीजजोडणी दिलेली आहे. या स्टोन क्रशरमध्ये सिमेंटच्या ब्लॉकची निर्मिती करण्यात येते. तथापि या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्यात या कारखान्याच्या जवळच असलेल्या फिडर पिलरला थेट केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले व 43,947 युनिटची म्हणजे 6 लाख 1 हजार 410 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. सुनील शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.
अनिल वरपे, सहाय्यक अभियंता श्री. रमेश सुळ तंत्रज्ञ सर्वश्री अजित मस्के, विजयकुमार गलंडे, बाळासाहेब तापकिर, सतीश राख, रवीकिरण मुंडे, किरण शिंदे, राहुल पाठक व चालक प्रमोद डगवार आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी दिपाली स्टोन क्रशरचे प्रोप्रायटर सचिन तानाजी खांदवे विरुद्ध बुधवारी (दि. 27) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.