Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या धडक मोहिमेत 130 कोटींच्या थकबाकीचा भरणा

Date:

वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र

पुणे, दि. 20 : थकीत वीजबिलांपोटी सुरु असलेल्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 4 लाख 43 हजार थकबाकीदारांनी चालू वीजबिलांसह थकबाकीपोटी 224 कोटी 80 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

पुणे परिमंडलात दि. 30 सप्टेंबरअखेर 6 लाख 19 हजार वीजग्राहकांकडे 190 कोटी 79 लाख रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेल्या महावितरणच्या धडक कारवाईत तब्बल 4,43,319 थकबाकीदारांकडून थकबाकीसह गेल्या दोन महिन्यांच्या चालू वीजबिलांची वसुली करण्यात आली आहे. यात 129 कोटी 95 लाख रुपयांच्या थकबाकीचा तर 94 कोटी 85 लाख रुपयांच्या चालू वीजबिलांच्या रकमेचा समावेश आहे.

महावितरणकडून पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत देयकांच्या वाढत्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिले न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची पुणे परिमंडलातील महावितरणची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्यासह अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या मोहिमेत 20,978 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यातील 13,914 वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर 10 कोटी 55 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी 7064 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत पुणे परिमंडलातील उर्वरित 1,53,053 थकबाकीदारांकडे असलेल्या 60 कोटी 83 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांची रक्कम वसुल करण्यासाठी महावितरणने लक्ष्य केंद्गीत केलेले आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकांची संख्या वाढवून आणखी तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदार वीजग्राहकांनी जवळच्या वीजजोडणीतून किंवा वीजचोरीतून वीज वापरल्यास भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खंडित असलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व महावितरणला नाईलाजास्तव कटू कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. चालू व थकीत देयकांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....