Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याच्या मोनिका शेख ठरल्या ‘आर्चर्झ मिसेस इंडिया २०१७’च्या सेकंड रनर-अप

Date:

पुणे – मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘आर्चर्झ मिसेस इंडिया २०१७’ या स्पर्धेत पुण्याच्या मोनिका शेख या सेंकड रनर-अप ठरल्या आहेत. देशभरातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर तसेच पंजाब येथून सुमारे ३८ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अमित तलवार, फिटनेस एक्सपर्ट लीना मोगरे, अभिनेता हितेन तेजवानी, सामाजिक कार्यकर्त्या बबिता वर्मा, अभिनेत्री रश्मी घोष आणि ज्योत्स्ना चांदोलास यांच्या पॅनलने स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. तर करिष्मा कोटक आणि करण वाही यांनी स्पर्धेचे सूत्रसंचलन केले.
मोनिका शेख यांना स्पर्धेतील मिसेस ग्लॅमरस म्हणूनही निवडण्यात आले. यावेळी मोनिका अतिशय उत्साहीत झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, “मिसेस इंडीया होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. सेंकड रनर-अप पदाचा मान मिळताना पाहून मला अतिशय आनंद होत आहे.”
मोनिका शेख या बॅगलेस स्कूलच्या संस्थापक आहेत. त्यांचे पती इम्रान शेख हे फिल्म प्रोड्यूसर असून त्यांना समीरा ही ८ वर्षांची गोंडस मुलगी आहे. मोनिका या मिसेस महाराष्ट्र २०१६ च्या ऑडिशनसाठी गेले असता ‘दिवा पेजंट स्टुडिओ’च्या कार्ल आणि अंजना मस्करेन्हस यांनी सर्वप्रथम त्यांच्यातील गुणवत्ता हेरली. कार्ल व अंजना यांच्या मार्गदर्शनाखाली मोनिका यांनी आपली पुढील वाटचाल सुरू केली. मोनिका यांनी त्यानंतर झालेल्या ‘मिसेस स्टाईल आयकॉन’ व ‘ब्यूटी विथ पर्पझ’ या स्पर्धा जिंकल्या. अंजना याच आपल्यासाठी मेंटर, फिलॉसॉफर व मार्गदर्शक असून मोनिका त्यांनाच आपल्या भरीव यशाचे श्रेय देतात.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

https://youtube.com/shorts/zq2TKqem9-Q गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते...

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...