पुणे :
समाजकार्याशी निगडित व्यावसायिक ,सामाजिक कौशल्ये शिकविण्याच्या हेतूने कर्वे समाज सेवा संस्थेत समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे .
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ . दीपक वालोकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न एम. एस. डब्लू.- समाजकार्य पदव्युत्तर
अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेची सुरवात झाली आहे . प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता www.karve-institute.org या वेबसाईटवर व महाविद्यालयात उपलब्ध असून, अर्ज डाऊनलोड करून महाविद्यालायाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ६ जून, २०१७ असून, प्रवेश परीक्षा दि. २० जुन,२०१७ रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा दि. २२ जुन, २०१७ तारखेला आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ज्या विदयार्थ्यांनी २०१७ मध्ये पदवी परीक्षा दिली आहे तो विद्यार्थी सुद्धा प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतो.
अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे . ; कर्वे समाज सेवा संस्था, १८, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे ४११०५२, वेबसाइट:kinss-institute.org. com, Email ID is – kinsspune@gmail.com, दूरध्वनी: ०२०- ६५००७५६५,६५००७५६६.
————–
नोकरीच्या संधी :
संपूर्ण भारतातून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा, पूर्ण वेळ, ( CBCS) चार सेमेस्टर सहित व चॉइस बेस क्रेडीट सिस्टमवर आधारित आहे.
या अभ्यासक्रमात एकूण चार स्पेशलायझेशनचा समावेश आहेत- कुटुंब व बाल कल्याण, मानव संसाधन व्यवस्थापन, वैद्यकिय व मानोपसोचार समाजकार्य, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास याचा त्यात समावेश आहे.
एम.एस.डब्लू. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शासकीय, खाजगी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक विविध क्षेत्रात बऱ्याच व्यावसायिक व नौकरीच्या संधी उपलब्ध असून, सामाजिक विकास, कुटुंब व बाल कल्याण संस्थामध्ये समुपदेशक, समन्वयक, मानव संसाधन व्यवस्थापनात, कामगार कल्याण किंवा कार्मिक प्रबंधक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकिय व मानोपसोचार समाजकार्य, हॉस्पिटल, सल्ल्मार्गदर्शन केंद्र, आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास प्रकल्प, सी.एस. आर प्रकल्प अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन संस्था इ.ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतात .
कर्वे समाज सेवा संस्था हि सर्वोत्तम दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता आणि उत्तम क्षेत्रकार्य प्रशीक्षणासाठी
ओळखली जाते तसेच प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हा एम.एस.डब्लू.अभ्यासक्रमाचा अविर्भाज्य अंतर्भूत घटक आहे.कर्वे समाज सेवा संस्था हि पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्था असून, न्याक मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त आहे . संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर, यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे विद्यापिठाच्या पदवीधराना नियमानुसार प्राध्यान्य दिले जाईल.