; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार
ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत
- १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन.
- लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्यतांचे प्रदर्शन.
- भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्स्ट-जनरेशन इनोव्हेशन्सच्या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने भारताच्या ऊर्जा भविष्याला प्रबळ करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे. ‘पॉवरिंग अ नॉन-स्टॉप इंडिया’ या आपल्या ब्रँड वचनाला अनुसरून कंपनी विविध उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये स्थिर, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा परिसंस्था विकसित करत आहे.
भारताच्या प्रगतीसाठी ऊर्जेची स्थिरता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असलेल्या काळात लॉरिट्झ क्नुडसेन लो-व्होल्टेज प्रोटेक्शनपासून ते इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि कनेक्टेड लिव्हिंग तंत्रज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रांत प्रगत सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. ही सर्व सोल्यूशन्स कामकाज विनासायास, सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
ही कटिबद्धता सिद्ध करत, कंपनीने नुकतेच मुंबईत ग्राहक, भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणून आपल्या विस्तारित पोर्टफोलिओचे प्रदर्शन केले. याद्वारे भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान भारताच्या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रांच्या अधिक जवळ नेणे आणि उद्योगांना अधिक स्मार्ट व ऊर्जा-क्षम बनवण्यासाठी सक्षम करणे, हा यामागचा उद्देश होता.
ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडेंट दीपक शर्मा म्हणाले, “भारताच्या विकासाची गाथा स्थिर, बुद्धिमान आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेवर आधारलेली आहे. लॉरिट्झ क्नुडसेन या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही अशी सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहोत, जी जागतिक मानकांनुसार असण्यासह भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांशी खोलवर जोडलेली आहेत. आम्ही भारतासोबत मोठे झालो आहोत, भारताकडून शिकलो आहोत, उत्पादनेही भारतातच तयार केली आहेत. आता आम्ही अशा विश्वसनीय, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा यंत्रणा सुनिश्चित करत आहोत, ज्या देशाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याला बळ देतील आणि या माध्यमातून आम्ही नव्या भारताची उभारणी करत आहोत.”
लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे सीओओ नरेश कुमार म्हणाले, “लॉरिट्झ क्नुडसेनमध्ये आमचा दृष्टिकोन ‘भारतासाठी डिझाइन आणि निर्मिती’ यावर ठामपणे आधारलेला आहे. आम्ही अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहोत, जे भारतातील वातावरणातील वास्तवाशी जुळणारे आहे, मग ते शेतकऱ्याला दूरवरून सिंचन व्यवस्थापित करण्यास सक्षम करणे असो किंवा एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे असो. आमचे वेगळेपण हे मेड-इन-इंडिया नाविन्यतांचे रूपांतर मोठ्या प्रमाणावरील वास्तव परिणामांमध्ये करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आहे. आम्ही उत्पादने बाजारपेठेत आणण्यासह ऊर्जा सुलभता वाढवून आणि कार्यक्षमता वाढवून भारताच्या औद्योगिक व ऊर्जा परिवर्तनाला मोठ्या प्रमाणावर सक्षम करत आहोत.”
या इव्हेण्टमध्ये लॉरिट्झ क्नुडसेनने भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एका विस्तारित राष्ट्रीय धोरणाची रूपरेषा मांडली. या वर्षाच्या सुरुवातीला, ब्रँडने १०० हून अधिक शहरांमध्ये ‘टेक्नॉलॉजी डे’ उपक्रम राबवण्यास सुरुवात केली, ज्याचा उद्देश उदयोन्मुख औद्योगिक क्लस्टर्समध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे. या प्रयत्नातून लॉरिट्झ क्नुडसेन अत्याधुनिक लो-व्होल्टेज, ऑटोमेशन, पॉवर क्वालिटी आणि सोलर सोल्यूशन्स प्रत्यक्ष भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणत आहे. यामुळे फक्त महानगरांपुरते मर्यादित न राहता भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.
टेक्नॉलॉजी शोकेसची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:
हे प्रदर्शन तंत्रज्ञानाच्या चार मुख्य स्तंभांमधील (pillars) नवनवीन संशोधनांवर आधारित आहे:
१. प्रोटेक्शन आणि स्विचगियर
लॉरिट्झ क्नुडसेन त्यांच्या ७० वर्षांहून अधिक काळाचा अभियांत्रिकी वारसा आणि संशोधन व विकास (आरअँडडी) क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतिबिंब असलेल्या लो-व्होल्टेज आणि मिडियम-व्होल्टेज संरक्षण, तसेच स्विचगियर सोल्यूशन्सचा अत्याधुनिक पोर्टफोलिओ प्रदर्शित करत आहे.
- ओमेगा युझेड एसीबी: हे नेक्स्ट-जनेरशन एअर सर्किट ब्रेकर आहे, ज्याची रचना अशा वातावरणासाठी केली गेली आहे, जिथे बिघाड होणे परवडणारे नाही. युझेड सिस्टम पारंपारिक संरक्षणाला पॉवर नेटवर्कमधील एका बुद्धिमान आणि कनेक्टेड पार्टनरमध्ये रूपांतरित करते. यामध्ये रिअल-टाइम सिस्टम मॉनिटरिंगसाठी इंटेलिजेंट हेल्थिनेस इंडिकेटर, अडॅप्टिव्ह एनर्जी रिडक्शन अँड इंटेलिजेंट सेफ्टी (एईआरआयएस) आणि जलद निदानासाठी एम्बेड केलेल्या क्यूआर कोडद्वारे इन्स्टंट ट्रिप इनसाईट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हे मोडबस टीसीपी/आयपी, एथरनेट आयपी, प्रोफायनेट आणि आयईसी ६१८५० द्वारे रिडंडंट कम्युनिकेशन, तसेच क्लास १ अचूकतेचे एनर्जी मीटरिंग प्रदान करते, ज्यामुळे वेगळ्या एमएफएमची गरज उरत नाही. १५० केएपर्यंत ब्रेकिंग क्षमतेसह युझेड कमी मालकी खर्च आणि पायाभूत सुविधांची दीर्घकालीन सुसंगतता सुनिश्चित करते.
- एक्सोरा.एन डिस्ट्रिब्युशन बोर्ड: ही एक मागणीवर आधारित, मॉड्युलर डिस्ट्रिब्युशन बोर्ड यंत्रणा आहे, जी निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधांच्या वापरासाठी ३० हून अधिक कॉन्फिगरेशनसह विद्युत वितरणाची नवीन व्याख्या करते. आयईसी ६१४३९-१ आणि ३ चे पूर्णपणे पालन करणारे हे बोर्ड आयपी५४ प्रोटेक्शन, ऑफ-साइट वायरिंगसाठी रिमूव्हेबल चेसिस आणि लोडमधील बदल किंवा अपग्रेड स्वीकारणारी भविष्यासाठी सज्ज रचनायांसह येते. यामध्ये ईव्ही चार्जिंग, वाय-फाय/ओएनटी आणि मिवान बांधकामासाठी विशेष प्रकार उपलब्ध आहेत.
- टीएमझेड: हे एक बुद्धिमान, रिअल-टाइम तापमान देखरेख सोल्यूशन आहे, जे इलेक्ट्रिकल स्विचबोर्डची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. बसबार आणि जॉइंट्स यांसारख्या गंभीर ठिकाणांवरील तापमानाची सतत नोंद ठेवून टीएमझेड ओव्हरलोडिंग किंवा सिस्टममधील त्रुटींमुळे होणाऱ्या ओव्हरहीटिंगची सुरुवातीची चिन्हे शोधण्यात मदत करते. आठ एनटीसी थर्मिस्टर्सनी सुसज्ज असलेले आणि झेडजी१००० गेटवे द्वारे वायरलेस कम्युनिकेशनची सुविधा असलेले हे साधन मोडबस टीसीपी/आयपी/एथरनेट द्वारे कंट्रोल रूमला डेटा विनासायासपणे पाठवते. तापमान निरीक्षणाचे रूपांतर एका निरंतर, डिजिटल आणि भविष्यवेधी क्षमतेत करून टीएमझेड संस्थांना केवळ बिघाड झाल्यावर दुरुस्ती करण्याऐवजी जोखमींचा अंदाज घेण्यास, बिघाड रोखण्यास आणि विनाव्यत्यय कामकाज सुनिश्चित करण्यास सक्षम करते.
- न्यूमरल रिलेज: न्यूमरल सिरीजमधील ड्रॉ-आउट न्यूमेरिकल प्रोटेक्शन रिलेज आधुनिक पॉवर सिस्टमसाठी सर्वसमावेशक संरक्षण, नियंत्रण आणि देखरेख प्रदान करतात. बुद्धिमान संरक्षण अल्गोरिदमद्वारे समर्थित न्यूमरल रिलेज उत्कृष्ट संवेदनशीलता, अचूक निवड आणि हाय-स्पीड फॉल्ट क्लिअरन्स सुनिश्चित करतात. यामुळे विविध औद्योगिक आणि युटिलिटी उपयोगांमध्ये विश्वासार्ह आणि समन्वित पॉवर सिस्टम संरक्षण मिळते. या उत्पादन श्रेणीमध्ये फीडर प्रोटेक्शन रिलेज, मोटर प्रोटेक्शन रिलेज आणि प्रतिबंधित अर्थ फॉल्ट (आरईएफ), न्यूट्रल डिस्प्लेसमेंट, रिव्हर्स पॉवर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी प्रोटेक्शन यांसारखी समर्पित संरक्षण सोल्यूशन्स समाविष्ट आहेत.
२. ऊर्जा आणि नवीन ऊर्जा
भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्याउद्दिष्टांशी सुसंगत राहून लॉरिट्झ क्नुडसेन आपला न्यू एनर्जी पोर्टफोलिओ सादर करत आहे. यामध्ये सौर ऊर्जा, डीसी पोर्टफोलिओ आणि ईव्ही चार्जिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे सर्व विशेषतः भारतात डिझाइन केलेले आणि उत्पादित केलेले आहे.
- सोलर इन्व्हर्टर्स: हे मेड-इन-इंडिया सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर भारतातील ग्रिड आणि हवामानाचा विचार करून तयार केले आहेत. यामध्ये प्रगत एमपीपीटी तंत्रज्ञानासह उच्च ऊर्जा रूपांतरण कार्यक्षमता आहे. तसेच, दिवसा जास्त वेळ वीज निर्मिती करण्यासाठी ४५ व्होल्ट इतका कमी स्टार्टअप व्होल्टेज, आरएस४८५/वाय-फाय/जीएसएमद्वारे रिमोट मॉनिटरिंग, स्थानिक डेटा स्टोरेज आणि १० वर्षांची वॉरंटी दिली जाते. याला ४० गिगावॅटहून अधिक सौर क्षेत्रातील अनुभवाचे पाठबळ आहे.
- डीसी पोर्टफोलिओ: सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज अशा डीसी पॉवर प्रोटेक्शन आणि डिस्ट्रिब्युशन सोल्यूशन्सद्वारे अक्षय ऊर्जा, विद्युतीकरण, ऊर्जा साठवणूक आणि ग्रीन हायड्रोजनकडे होणाऱ्या जलद संक्रमणास मदत करण्यासाठी याची रचना केली आहे. आधुनिक ऊर्जा प्रणालींमध्ये डीसी हा मुख्य आधार बनत असताना हा पोर्टफोलिओ ग्राहकांना पारंपारिक एसी-केंद्रित डिझाइनकडून उच्च कार्यक्षमता, सुधारित सुरक्षा आणि अधिक विश्वासार्हता देणाऱ्या उच्च-कार्यक्षमता डीसी आर्किटेक्चरकडे वळण्यास सक्षम करतो. उच्च फॉल्ट करंट्स, सातत्यपूर्ण आर्शिंग आणि संवेदनशील पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या डीसी पॉवरच्या आव्हानांना हाताळण्यासाठी हे सोल्यूशन्स तयार केले गेले आहेत, ज्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये अखंडित कार्यक्षमता सुनिश्चित होते.
- ईव्ही चार्जर्स: लॉरिट्झ क्नुडसेनचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स भारतातील परिस्थितीसाठी डिझाइन केलेली एक अखंड, स्केलेबल आणि विश्वासार्ह परिसंस्था प्रदान करतात. स्मार्ट एसी/डीसी चार्जर्स, एकात्मिक चार्जिंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आणि वापरण्यास सुलभ मोबाइल अॅप्लिकेशन यांचा समावेश असलेला हा पोर्टफोलिओ फॅसिलिटी मॅनेजर्सना निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी कार्यक्षम तैनाती, सुलभ ऑपरेशन आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यास सक्षम करतो.
३. ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन
लॉरिट्झ क्नुडसेन आपला डिजिटल आणि ऑटोमेशन पोर्टफोलिओ सादर करत आहे, जो उद्योगांना केवळ बिघाड झाल्यावर दुरुस्ती करण्याच्या पद्धतीकडून भविष्यवेधी आणि माहितीवर आधारित कार्यप्रणालीकडे वळण्यास सक्षम करतो.
- आयएमएमआर – इंटेलिजेंट मोटर मॅनेजमेंट रिले: हे इंटेलिजेंट मोटर कंट्रोल सेंटर (आयएमसीसी) मधील मुख्य बुद्धिमत्ता आहे. आयएमएमआर इलेक्ट्रिक मोटर्सचे सर्वसमावेशक संरक्षण, देखरेख आणि व्यवस्थापन करते. बिघाड लवकर ओळखण्यासाठी,प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स’साठी आणि अचानक येणारा डाउनटाइम कमी करण्यासाठी हे सतत रिअल-टाइम ऑपरेशन्स आणि निदानाचा डेटा संकलित करते. मोडबस आरटीयू, मोडबस टीसीपी/आयपी, एथरनेट आयपी, प्रोफायनेट आणि प्रोफायनेट डीपीच्या पाठिंब्यासह हे पीएलसी, डीसीएस आणि एससीएडीए सिस्टममध्ये विनासायासपणे जोडले जाऊ शकते. याची संक्षिप्त रचना आणि प्री-प्रोग्राम्ड स्टार्टर लॉजिकमुळे पॅनेल वायरिंगमधील गुंतागुंत आणि कार्यान्वित करण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.
- स्मार्टकॉम डिजिटल ट्विन: ही प्रत्यक्ष स्विचबोर्डची एक अत्यंत अचूक आणि रिअल-टाइम डिजिटल प्रतिकृती आहे, जी सेन्सर्सच्या माध्यमातून वास्तविक ऑपरेटिंग परिस्थितीचे प्रतिबिंब दाखवते. हे प्रेडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स सक्षम करते, जे बिघाडाचा प्रकार, त्याची तीव्रता आणि अचूक स्थान ओळखते, ज्यामुळे दोष निवारणाचा वेळ आणि अनपेक्षित डाउनटाइम कमी होतो. डिजिटल ट्विन फॉरवर्ड-लुकिंग सिम्युलेशनची सुविधा देते, ज्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष ऑपरेशन्सवर कोणताही परिणाम न करता, बदलता लोड, तापमान किंवा कार्यात्मक ताण या परिस्थितीत स्विचबोर्डच्या वर्तनाचे मूल्यमापन करता येते.
- अॅग्री ऑटोमेशन पोर्टफोलिओ: ही एक बुद्धिमान, एकमेकांशी जोडलेली आणि शेतकरी-केंद्रित ऑटोमेशन परिसंस्था आहे. यामध्ये सिंचन ऑटोमेशन, फर्टिगेशन (खत आणि पाणी व्यवस्थापन), मोटर आणि पंप ऑटोमेशन, सेन्सर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. वेळ-आधारित, प्रमाण-आधारित आणि सेन्सर-आधारित ऑटोमेशनची सांगड स्मार्टकॉम प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल आणि क्लाउड कनेक्टिव्हिटीशी घालून हा पोर्टफोलिओ संपूर्ण भारतातील लहान, मध्यम आणि मोठ्या कृषी उद्योगांसाठी डेटा-आधारित आणि शाश्वत शेती सक्षम करतो.
४. होम आणि बिल्डिंग टेक्नॉलॉजीज (गृह आणि इमारत तंत्रज्ञान)
लॉरिट्झ क्नुडसेन या प्रदर्शनात प्रीमियम स्मार्ट होम आणि बिल्डिंग ऑटोमेशन तंत्रज्ञान सादर करत आहे, जे एकमेकांशी जोडलेली आणि ऊर्जा-कार्यक्षम राहणीमान व कामाची ठिकाणे सक्षम करतात.
- एनकनेक्ट होम ऑटोमेशन: हे एक वायरलेस आणि वाय-फाय सक्षम होम ऑटोमेशन सोल्यूशन आहे, जे स्पर्श , मोबाइल अॅप किंवा व्हॉइस कमांडद्वारे दिवे, पंखे, एअर कंडिशनर्स आणि पडद्यांचे अखंड नियंत्रण देते. हे मॉड्युलर असून सर्व प्रकारच्या घरांसाठी ‘रेट्रोफिट-कंपॅटिबल’ (जुने बदल न करता बसवता येणारे) आहे, ज्यासाठी कोणत्याही नवीन वायरिंगची आवश्यकता नसते आणि कोणताही स्थानिक इलेक्ट्रिशियन ते बसवू शकतो. भविष्यासाठी सज्ज प्लॅटफॉर्म म्हणून डिझाइन केलेले एनकनेक्ट, सोलर इन्व्हर्टर आणि स्मार्ट लॉकशी जोडले जाऊ शकते. एनकनेक्टमध्ये स्मार्ट डीबी देखील समाविष्ट आहे, जे लॉरिट्झ क्नुडसेनचे एक बुद्धिमान फायनल डिस्ट्रिब्युशन बोर्ड आहे. हे औद्योगिक, पायाभूत सुविधा आणि घरगुती वापराच्या दैनंदिन इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये संवाद आणि रिमोट मॅनेजमेंटची क्षमता प्रदान करते.
हे टेक्नॉलॉजी शोकेस भारतातील उद्योग, युटिलिटीज, पायाभूत सुविधा विकासक आणि बिल्डिंग प्रोफेशनल्ससाठी एक धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदार म्हणून लॉरिट्झ क्नुडसेनचे स्थान अधिक मजबूत करते. सात दशकांहून अधिकचा अभियांत्रिकी वारसा, मेक-इन-इंडियाचा मजबूत उत्पादन पाया आणि वाढता डिजिटल पोर्टफोलिओ यासह लॉरिट्झ क्नुडसेन भारताच्या इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन परिसंस्थेच्या भविष्याला आकार देणे सुरू ठेवत आह

