पुणेकरांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी २०० MLD जलशुद्धीकरण प्रकल्पाला गती द्या!

Date:

CWPRS ची ४ हेक्टर जागा हस्तांतरित करण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे महापौर मंजुषा नागपुरे यांचे आग्रही निवेदन

पुणे | गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २०० MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (CWPRS) यांची सुमारे ४ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेकडे तातडीने हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. ना. श्री. सी. आर. पाटील आणि केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री मा. ना. डॉ. राज भूषण चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी हे आज पुणे दौऱ्यावर आले असता, केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महापौर मंजुषा नागपुरे यांनी त्यांची भेट घेऊन पुण्याच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेमध्ये (CWPRS) आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, ‘जल संचय जन भागीदारी’ आढावा बैठक तसेच वडगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (STP) पाहणीदरम्यान ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या १२ गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता खडकवासला येथे २०० MLD क्षमतेचे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा सुमारे ८९० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र शासनाच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ अंतर्गत यापूर्वीच मंजूर झाला आहे. मात्र, प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली CWPRS ची सुमारे ४ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या जागेच्या हस्तांतरणास जलशक्ती मंत्रालयाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौरांनी केली.

नागरिकांचे आरोग्य हीच सर्वोच्च प्राथमिकता!

पुणे परिसरात दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. यापूर्वी गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) सारख्या गंभीर आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारचे आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ यांनीदेखील पुणेकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी यापूर्वी केंद्र शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत या प्रकल्पाची आवश्यकता आणि जागा हस्तांतरणाचा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे ठामपणे मांडला.

पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची तांत्रिक आवश्यकता, नियोजन आणि महत्त्व याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच वडगाव STP प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता श्रीमती मनीषा शेकटकर, अधीक्षक अभियंता श्री. संजय गायकवाड आणि कार्यकारी अभियंता श्री. कराळे यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती व तांत्रिक बाबी सादर केल्या.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी मांडलेली आग्रही भूमिका, खासदार मुरलीधर मोहोळ यांचे भक्कम पाठबळ आणि महापालिका प्रशासनाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण याची दखल घेत केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील आणि राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच जागा हस्तांतरणासह प्रकल्पासंदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले.

पुणेकरांना शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांचा केंद्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून, हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात खासगी मोकळ्या जागांवर राडारोडा दिसल्यास ५ लाखांचा दंड! महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी मालकाची;...

जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश!

इमारतींच्या फ्रंट,साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे , रस्ते अरुंद करणारी...

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबरपासून बदल

स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणारा राईट टर्न बंद; वाहनचालकांनी पर्यायी...