पुण्यात खासगी मोकळ्या जागांवर राडारोडा दिसल्यास ५ लाखांचा दंड! महापालिका आयुक्तांचा कडक इशारा

Date:

नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी मालकाची; सार्वजनिक स्वच्छता आणि शहराच्या विद्रूपीकरणावरून महापालिकेची कठोर भूमिका

पुणे, दि. १९ नोव्हेंबर २०२६ | माय मराठी प्रतिनिधी

पुणे शहरातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागांवर बांधकामाचा राडारोडा आणि कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. अशा जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित जागामालकाची असल्याचे स्पष्ट करत, नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांत राडारोडा हटविण्यात अपयश आल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर प्रकटनातून ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

हा घ्या पुरावा .. कोण कुठे टाकतो राडारोडा .. संग आयुक्त साहेब इथे कधी करणार कारवाई

खासगी जागांवरील राडारोड्यामुळे पुण्याचे विद्रूपीकरण

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक खासगी मोकळ्या जागांवर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून बांधकामाचा राडारोडा टाकण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

शहराचे आर्थिक, राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारे राडारोड्याचे ढीग साचणे शहराच्या स्वच्छतेला आणि प्रतिमेला बाधा आणणारे असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मात्र राडारोडा दुसऱ्या व्यक्तीने टाकला असला, तरी संबंधित जागेची स्वच्छता राखण्याची प्राथमिक जबाबदारी जागामालकाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांची मुदत

महापालिकेच्या जाहीर प्रकटनानुसार, खासगी जागेवर राडारोडा आढळल्यास संबंधित जागामालकाला पत्राद्वारे किंवा नोटिशीद्वारे कळविण्यात येईल.

त्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित जागेतील राडारोडा हटविणे आणि जागेची स्वच्छता करणे अपेक्षित आहे.

दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद

जाहीर प्रकटनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील संबंधित तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच अधिनियमातील कलम १४ अंतर्गत नियम क्रमांक ८ व १०(१) नुसार पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

त्यामुळे शहरातील खासगी मोकळ्या जागांच्या मालकांनी आपल्या मालमत्तेवर राडारोडा साचणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे.

राडारोडा टाकणाऱ्यांवरही कारवाई होणार का?

खासगी जागेची स्वच्छता राखण्याची जबाबदारी मालकावर निश्चित करण्यात आली असली, तरी राडारोडा प्रत्यक्ष टाकणाऱ्या व्यक्ती किंवा वाहनांवर कोणती कारवाई केली जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

रात्रीच्या वेळी किंवा लपूनछपून बांधकामाचा राडारोडा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी नियमित देखरेख आणि संबंधितांवर कारवाईची आवश्यकता आहे.

दरम्यान, महापालिकेच्या नव्या इशाऱ्यानंतर शहरातील मोकळ्या जागांमधील राडारोड्याचे प्रमाण किती कमी होते आणि प्रत्यक्ष किती ठिकाणी कारवाई केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

mymarathi.net

माय मराठी — महाराष्ट्राचा आवाज जगभर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश!

इमारतींच्या फ्रंट,साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे , रस्ते अरुंद करणारी...

कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबरपासून बदल

स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणारा राईट टर्न बंद; वाहनचालकांनी पर्यायी...