कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबरपासून बदल

Date:

स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणारा राईट टर्न बंद; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

पुणे, दि. १९ : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामासाठी कात्रज मुख्य चौकातील जड वाहतूक वळविण्यात आली आहे. या कामाच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी कात्रज डेअरी चौकातील वाहतुकीत १९ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार, स्वारगेटकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील कात्रज डेअरी चौकातील उजवे वळण (राईट टर्न) बंद करण्यात आले आहे. स्वारगेटकडून बालाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी चौकाच्या २५० मीटर अलीकडे, तर सरहद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी चौकाच्या २५० मीटर पुढे यू-टर्न घ्यावा. तसेच सरहद चौकाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज डेअरी चौकातून डावीकडे स्वारगेटच्या दिशेने वळून १०० मीटर पुढे यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.

वाहनचालकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’त इंदिरा गांधींना अभिवादन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

पिंपरी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी...