पिंपरी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त पीएमआरडीएतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
इंदिरा गांधी यांची जयंती १९ नोव्हेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या सर्वांगीण विकासात आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करण्यात इंदिरा गांधी यांनी दिलेल्या योगदानाचे या वेळी स्मरण करण्यात आले.

