५० लाख देऊनही निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेचे नाव गायब! धंगेकरांचा मोहोळ आणि अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा संतापजनक इशारा

Date:

‘पुणे महापालिकेची उघड फसवणूक’; महापालिकेचा लोगो नाही, आयुक्त आणि गटनेत्यांनाही निमंत्रण नाही; ५० लाख रुपये वसूल करण्याची धंगेकरांची मागणी

पुणे : पुणे मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुणे महानगरपालिकेने तब्बल ५० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली असतानाही, या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेचा लोगो किंवा ‘पुणे महापालिका प्रायोजक’ असा कोणताही उल्लेख नसल्याचा गंभीर आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. महापालिकेचा निधी घेऊनही निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेचे नाव नाही, आयुक्त आणि गटनेत्यांनाही निमंत्रण नाही. हा प्रकार म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पुणेकरांची उघड फसवणूक असल्याचा आरोप करत धंगेकर यांनी खासदार मुरलीधर मोहोळ आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पुणे मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने ५० लाख रुपये दिले आहेत. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेचा लोगो अथवा प्रायोजक म्हणून नाव छापण्यात आलेले नाही. उलट इतर खासगी कंपन्यांचे लोगो निमंत्रण पत्रिकेवर वापरण्यात आले आहेत. महापालिकेचा निधी वापरूनही महापालिका आयुक्त आणि गटनेत्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचा मुद्दाही धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

‘पैसे वर्ग करण्याची एवढी घाई कशासाठी?’

महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धंगेकर म्हणाले, “महापालिकेकडून कोणत्याही कार्यक्रमाला प्रायोजकत्व देताना नियमानुसार कार्यक्रम झाल्यानंतर पैसे वर्ग केले जातात. असे असताना या कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांनी एवढी घाईघाईने तत्परता दाखवण्याचे कारण काय? कोणतीही शहानिशा न करता ५० लाख रुपये वर्ग करताना, या बदल्यात महापालिकेला काय मिळणार आहे, पालिकेचे प्रायोजक म्हणून नाव वापरले जाणार आहे की नाही, याची साधी खातरजमाही अधिकाऱ्यांनी केलेली नाही.”

केवळ एका राजकीय पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेवर छापून सरकारी पैशातून राजकीय प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘महापालिकेच्या तिजोरीवर ५० लाखांचा दरोडा’

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुणे महापालिकेच्या तिजोरीवर ५० लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा घणाघाती आरोप धंगेकर यांनी केला आहे. पुणेकरांच्या कष्टाच्या कराचा पैसा अशा प्रकारे खासगी आणि राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

५० लाख रुपये वसूल करण्याची मागणी

या प्रकरणातील संबंधित महापालिका अधिकारी आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर तातडीने फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत. तसेच महापालिकेचे ५० लाख रुपये वसूल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

मॅरेथॉनसाठी महापालिकेने दिलेल्या ५० लाख रुपयांच्या निधीचा वापर, प्रायोजकत्वाच्या अटी आणि निमंत्रण पत्रिकेवरील तपशील यावरून आता महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमित शहांना सुतारदऱ्यातील टेकडीफोड दाखवायला कोणी घेऊन जाईल काय?

तक्रारी झाल्या, कामबंदीचे आदेश निघाले, स्थायी समितीत गुन्हा दाखल...

दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार पुणे-स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना...

मोहोळांच्यासाठी पुणेकरांच्या पैशांतून ५० लाखांची उधळपट्टी; रविराज काळेही आयुक्तांवर संतापले!

‘खासदारांचे ब्रँडिंग करण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार आयुक्तांना...

अमित शहा हिटलर, मुसोलिनी की परवेझ मुशर्रफ? प्रशांत जगतापांचा संतप्त सवाल!

अमित शहा पुण्यात आले की काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का?...