दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका

Date:

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड मध्ये अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. दिवंगत सहकारी श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा प्रयत्न आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा एक अद्ययावत सोईसुविधांनीयुक्त अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प होता.

त्यानुसार, कोथरुड मधील कर्वेनगर भागात ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असून, सर्वप्रकारच्या सोईसुविधांनी युक्त असे आणि अतिशय माफक शूल्क आकरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, त्यांच्या संघर्षाला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या यशाच्या प्रवासात हातभार लागावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरेल आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर करेल, असा विश्वास आहे,” असे मत यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, एका सहकाऱ्याच्या स्मृतींना सामाजिक उपक्रमातून जिवंत ठेवत विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा हा उपक्रम श्रीपाद ढेकणे यांना समर्पित भावपूर्ण आदरांजली ठरला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोहोळांच्यासाठी पुणेकरांच्या पैशांतून ५० लाखांची उधळपट्टी; रविराज काळेही आयुक्तांवर संतापले!

‘खासदारांचे ब्रँडिंग करण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार आयुक्तांना...

अमित शहा हिटलर, मुसोलिनी की परवेझ मुशर्रफ? प्रशांत जगतापांचा संतप्त सवाल!

अमित शहा पुण्यात आले की काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का?...

१९ व्या महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डॉ. इंद्रजीत भालेराव!

स्वागताध्यक्षपदी दत्ताशेठ झुरंगे यांची निवड; २७ नोव्हेंबरला सासवडमध्ये साहित्यिक...