मोहोळांच्यासाठी पुणेकरांच्या पैशांतून ५० लाखांची उधळपट्टी; रविराज काळे आयुक्तांवर संतापले!

Date:

‘खासदारांचे ब्रँडिंग करण्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार आयुक्तांना कोणी दिला?’; आम आदमी पार्टी युवा आघाडीचा सवाल, आंदोलनाचा इशारा

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक काटकसरीची चर्चा सुरू असताना पुणे महानगरपालिकेकडून एका मॅरेथॉन आयोजनासाठी तब्बल ५० लाख रुपये देण्याच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार (ठराव क्र. १५४८, दि. ५ नोव्हेंबर २०२६) १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे युनिटी रन-२०२६’ या मॅरेथॉनसाठी ५० लाख रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयावर आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी तीव्र आक्षेप घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘Give2Save Nest Foundation’ आणि ‘संस्कृती फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी महापालिकेने एवढा मोठा निधी देण्याची आवश्यकता काय, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत संताप व्यक्त करताना रविराज काळे म्हणाले, “एकीकडे देशाचे पंतप्रधान राज्यातील आणि देशातील जनतेला आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खर्चाचे प्रमाण कमी करण्याचे आणि काटकसर करण्याचे आवाहन करत आहेत. दुसरीकडे मात्र पुणे महानगरपालिका पुण्याच्या खासदारांवर एवढी मेहेरबान का झाली आहे? खासदारांचे ब्रँडिंग करण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांच्या कररूप पैशांची अशी उधळपट्टी करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना कोणी दिला?”

‘५ ते १० लाखांत होणाऱ्या कार्यक्रमासाठी ५० लाख कशाला?’

पुढे काळे म्हणाले की, या संपूर्ण प्रकारामुळे आणि निधीच्या उधळपट्टीमुळेच बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असावी. अवघ्या ५ ते १० लाख रुपयांत सहज आयोजित होऊ शकणाऱ्या मॅरेथॉनसाठी ५० लाख रुपये खर्च करून नेत्यांची चमकोगिरी करणे ही कोणती नीतिमत्ता आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काटकसरीचे आवाहन एका बाजूला, ५० लाखांची तरतूद दुसरीकडे!

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत काळे यांनी महापालिकेच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरसेवकांचे मानधन आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात काटकसर केली जात असल्याचा दावा करताना, दुसरीकडे एका इव्हेंटसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

जनतेच्या कररूप पैशांचा वापर करताना महापालिकेने सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे. मॅरेथॉनसाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या खर्चाचा निर्णय तात्काळ थांबवावा, अशी मागणी रविराज काळे यांनी केली आहे. अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने मंजूर केलेल्या ५० लाख रुपयांच्या खर्चावरून आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमित शहा हिटलर, मुसोलिनी की परवेझ मुशर्रफ? प्रशांत जगतापांचा संतप्त सवाल!

अमित शहा पुण्यात आले की काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का?...

१९ व्या महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डॉ. इंद्रजीत भालेराव!

स्वागताध्यक्षपदी दत्ताशेठ झुरंगे यांची निवड; २७ नोव्हेंबरला सासवडमध्ये साहित्यिक...

कॉकरोच जनता पार्टीची महाराष्ट्र राज्य समन्वय समिती जाहीर; १५ सदस्यांवर संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी!

पश्चिम झोनच्या प्रभारीपदी क्षितिज पगार यांची नियुक्ती; बेरोजगारी, शिक्षण...