“मुख्यमंत्री सकारात्मक असतील तर चांगली बातमी यायलाच हवी”; MPSC आंदोलनावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Date:

राज ठाकरे–फडणवीस चर्चेनंतर आशावाद, पण अध्यक्षांच्या राजीनाम्यासह आयोगाच्या शुद्धीकरणाच्या मागणीवर विद्यार्थी ठाम

पुणे : एस. एम. जोशी पुलावरील MPSC विद्यार्थी आंदोलनाचा आज नववा दिवस असून आंदोलन अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत लवकरच चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर रोहित पवार यांनीही सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचे म्हटले. मात्र विद्यार्थी केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नसून MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह आयोगाच्या कामकाजात व्यापक सुधारणा आणि पारदर्शकतेच्या मागण्यांवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाला परवानगी नाकारून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले असले तरी विद्यार्थी आंदोलन सुरू ठेवत आहेत. पर्यायी आंदोलनस्थळी परवानगीसाठी अर्ज करता येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आज सकाळच्या आणखी एका महत्त्वाच्या अपडेटनुसार, उपोषणावर असलेल्या सात जणांपैकी तिघांनी प्रकृतीसंदर्भातील कारणांमुळे उपोषण सोडल्याचे वृत्त आहे. मात्र आंदोलन सुरूच आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related