आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये भांडणे लावणे ही भाजपची निती, इंग्रजाप्रमाणे तोडा-फोडा व राज्य करा हे भाजपचे धोरण.

Date:

मुंबई, दि. २१ सप्टेंबर २०२६.

राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. गणपती बाप्पा, या सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी दे, अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, सरकार फक्त प्रक्रिया सुरु आहे एवढेच सांगत आहे पण ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करत नाही. महायुती सरकारने कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र सरकार चालढकल करत आहे. कर्जमाफी केली तीही फसवीच निघाली. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्याच्या बैठकीत अधिकारी व्हिडिओ पहात असतात, तर सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात आहेत. सरकारने लाजलज्जा सर्व सोडून दिले आहे, त्यांना कशाचेही गंभीर्य राहिलेले नाही. विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळणारा कृषी मंत्री याआधी राज्याला लाभला होता, आता अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ पहात बसतात, यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे राहिलेले नाही.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, तरुणाई राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, हे चित्र भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारे आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता व ते सरकारला थेट जाब विचारत असल्याने भाजपा नेते राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप व टीका करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी स्टँडअप कॉमेडियनचे काम करावे अशी केलेली टीका, ही त्याचाच एक भाग आहे. फडणवीस यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांना मी गेट वेल सून देवेंद्रजी, एवढेच म्हणतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

इंग्रजांनी ज्याप्रमाणे तोडाफोडा व राज्य करा निती अवलंबली होती त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सरकार आरक्षणाच्या नावाखाली समाजातील विविध जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. मराठा-ओबीसी, आदिवासी, व्हिजेएनटी अशी भांडणे लावली जात आहेत. नाहीरे वर्गाला हात देण्याचे काम आहेरे वर्गाने करायला हवे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

IIT बॉम्बे विद्यार्थी आत्महत्या प्रकरण; प्रा. दुल्ला डीनपदावरून निलंबित.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूआधीच्या घटनांबाबत आधी केलेले वक्तव्य अयोग्य...

गणेशोत्सव काळात मोबाईल टॉयलेटसाठी आले ६९.८४ लाखांचे टेंडर

पाच निविदांमध्ये ‘प्राप्ती एन्व्हायरो सर्व्हिसेस’ची निविदा सर्वात कमी; अंदाजित...

पुण्याला जागतिक GCC हब बनविण्यासाठी महापालिकेचा पंचतारांकित संवाद ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी ऑनलाइन संवाद;...