पुण्याला जागतिक GCC हब बनविण्यासाठी महापालिकेचा पंचतारांकित संवाद ..

Date:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी ऑनलाइन संवाद; महाराष्ट्रात ४०० नवीन GCC आणि ४ लाख उच्च-कौशल्य रोजगारांचे उद्दिष्ट

पुणे : प्रतिनिधी

पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (Global Capability Centre – GCC) प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने तसेच उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि गरजा जाणून घेण्यासाठी ‘व्हाय नॉट पुणे?’ या विषयावर उच्चस्तरीय संवादाचे आयोजन करण्यात आले. माहिती-तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन तसेच विविध उद्योग क्षेत्रांतील देशपातळीवरील प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी या संवादात सहभागी झाले.पुण्यातील महापालिकेच्या अलिशान सभागृहांमध्ये अथवा महापौर बंगल्यात नाही तर हि बैठक पंचतारांकित हॉटेलात पार पडली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला संबोधित केले. पुण्यात उत्पादन, तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची भक्कम पायाभूत परिसंस्था असून GCC केंद्रांसाठी पुणे हे नैसर्गिक आणि सक्षम ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने स्वतंत्र GCC धोरण तयार केले असून पुण्याला प्रमुख GCC हब म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र GCC धोरण २०२५ अंतर्गत राज्यात सुमारे ४०० नवीन GCC केंद्रे आकर्षित करणे आणि ४ लाख उच्च-कौशल्याधारित रोजगार निर्माण करणे, हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पुण्यातील मेट्रो, रिंग रोड, बोगदे तसेच वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा उल्लेख करत शहरातील कनेक्टिव्हिटी आणि राहणीमान अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात उपलब्ध असलेले अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ हे GCC विकासासाठी मोठे बलस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी धोरणातील संभाव्य त्रुटी, कार्यपद्धतीतील अडचणी आणि शासनाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या बाबींवर सूचना मांडाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. व्यवहार्य सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी संवादात सहभागी झालेल्या उद्योग प्रतिनिधींचे आभार मानले. अशा संवादातून पुणे शहर, उद्योग क्षेत्र आणि जागतिक व्यावसायिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उद्योग क्षेत्र आणि प्रशासनातील संवादाची दरी कमी करणे, शहरातील विकास आराखडे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि भविष्यातील संधींची माहिती उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

हा संवाद केवळ प्रशासनाकडून माहिती देण्यापुरता मर्यादित नसून उद्योग प्रतिनिधींनी आपल्या अपेक्षा आणि सूचना मांडाव्यात आणि त्यानुसार शहर विकासाच्या योजना अधिक व्यावहारिक व उद्योगाभिमुख करता याव्यात, यासाठी हे व्यासपीठ असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पुण्याची विविध क्षेत्रांचा समतोल साधणारी ओळख कायम राखत शहराला प्रमुख गुंतवणूक आणि व्यवसाय केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या संवादात महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, तसेच PMRDA, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बैठकीतून आलेल्या सूचना आणि अपेक्षांचे संकलन करून त्याचे कृती आराखड्यात रूपांतर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित कामांचा आढावा, अंमलबजावणी आणि पाठपुरावा करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

या संवादामुळे शासन आणि उद्योग क्षेत्रातील सातत्यपूर्ण समन्वय अधिक मजबूत होऊन पुण्याच्या GCC, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कुशल मनुष्यबळ आणि भविष्यातील आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव काळात मोबाईल टॉयलेटसाठी आले ६९.८४ लाखांचे टेंडर

पाच निविदांमध्ये ‘प्राप्ती एन्व्हायरो सर्व्हिसेस’ची निविदा सर्वात कमी; अंदाजित...

१.३१ कोटी रुपये भाडे देऊन JCB भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करा आणि थेट JCB विकत घ्या – कॉंग्रेस नगरसेवकांचा प्रस्ताव

रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्यासह पाच सदस्यांचे फेरविचाराचे पत्र;...