‘Bappa.org’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Date:

पुणे, दि. २० : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि वैशिष्ट्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, प्रथा आणि आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

आपल्या बाप्पाची कथा जगासमोर मांडा
पुणे जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गणेशोत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. अनेक कुटुंबे, गाव आणि गणेश मंडळे पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक प्रथा, आरत्या आणि उत्सवाची वैशिष्ट्ये जपत आहेत. या परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ हे प्रभावी माध्यम ठरू शकते.

आठवणी, परंपरा आणि पाककृतीही करता येणार शेअर
‘Bappa.org’ या डिजिटल मंचावर नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, पारंपरिक प्रथा, आरत्या, छायाचित्रे, नैवेद्य व पाककृती तसेच उत्सवाशी संबंधित सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती नोंदविता येणार आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे ध्वनिचित्रमुद्रण, गणेशोत्सवाची छायाचित्रे, पारंपरिक नैवेद्य व पाककृती तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विशेष परंपरांची माहितीही नागरिक या माध्यमातून शेअर करू शकतात.

“आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा ‘Bappa.org’च्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात. आपल्या बाप्पाशी जोडलेल्या आठवणी, श्रद्धा आणि परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदत व सरसकट कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

शक्तीपीठ महामार्गावरील खर्च शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी; बुलढाणा दौऱ्यात महायुती...

कर्वेनगरमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण उत्साहात

मधुसंचय गणपती मंदिरात ३०० महिलांचा सहभाग; ‘कुटुंब प्रबोधन आणि...

‘महावितरणमध्ये बघतो, करतो…’चे दिवस संपले; आता रिझल्ट पाहिजे – दिनेश अग्रवाल

१० दिवसांत ६८२ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पुणे, दि. २० सप्टेंबर...