कर्वेनगरमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण उत्साहात

Date:

मधुसंचय गणपती मंदिरात ३०० महिलांचा सहभाग; ‘कुटुंब प्रबोधन आणि पंच परिवर्तन’ विषयावर मार्गदर्शन

पुणे, दि. २० सप्टेंबर २०२६ : कर्वेनगर येथील मधुसंचय सोसायटीच्या गणपती मंदिरात महिला सामूहिक अथर्वशीर्ष समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ पठणाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. समितीच्या या उपक्रमाचे यंदाचे १८ वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध शंखवादक मधुकर शिधये यांनी शंखवादन करून मंगलमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. स्वाती हिर्लेकर यांनी अथर्वशीर्ष सादर केले.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून प्रतिमा चोळकर उपस्थित होत्या. त्यांनी ‘कुटुंब प्रबोधन आणि पंच परिवर्तन’ या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कुटुंबसंस्थेचे महत्त्व, संस्कारांचे स्थान आणि समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.

कर्वेनगर परिसरातील सुमारे ३०० महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला.

आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनीषा जावळे, कविता शेंडे, स्मिता लाटे, भारती जोशी, श्वेता क्षीरसागर, माधवी जोशी, ज्योत्स्ना शिंदे आणि समिधा मुळे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आयोजन महिला सामूहिक अथर्वशीर्ष समिती, मधुसंचय, कर्वेनगर, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदत व सरसकट कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

शक्तीपीठ महामार्गावरील खर्च शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी; बुलढाणा दौऱ्यात महायुती...

‘Bappa.org’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २० : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य...

‘महावितरणमध्ये बघतो, करतो…’चे दिवस संपले; आता रिझल्ट पाहिजे – दिनेश अग्रवाल

१० दिवसांत ६८२ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पुणे, दि. २० सप्टेंबर...