‘महावितरणमध्ये बघतो, करतो…’चे दिवस संपले; आता रिझल्ट पाहिजे – दिनेश अग्रवाल

Date:

१० दिवसांत ६८२ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट

पुणे, दि. २० सप्टेंबर २०२६ : काळ बदलला आहे. ‘बघतो’, ‘करतो’, ‘पुढच्या महिन्यात होईल’ अशी उत्तरे आता चालणार नाहीत. यापुढे कामाचा रिझल्ट अपेक्षित आहे. उद्दिष्टपूर्ती झाली नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) दिनेश अग्रवाल यांनी पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला. सप्टेंबरअखेरपर्यंत चालू वीजबिलासोबत अतिरिक्त ६८२ कोटी रुपये थकबाकीतून वसूल करण्याचे उद्दिष्ट त्यांनी दिले आहे.

महावितरणने पुणे व बारामती परिमंडलाचे पालकत्व कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांच्याकडे सोपविले आहे. पालक संचालक म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी (दि. १९) रास्तापेठ येथील पॉवर हाऊस येथे पुणे परिमंडलातील वसुली, वीज गळती आणि कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (वि.व ले.) सौ. कीर्ती भोसले यांच्यासह पुणे परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

अग्रवाल म्हणाले, “आपला स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी ज्या तळमळीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपण प्रयत्न करतो, त्याच भावनेने महावितरणच्या उत्कर्षासाठी काम करा. शंभर टक्के वसुलीसोबतच वीज गळती कमी करण्यासाठी ठोस ॲक्शन प्लॅन तयार करा. त्यानुसार कामाचे नियोजन करून निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करा.”

सप्टेंबर महिन्याच्या चालू देयकासह पुणे परिमंडलाने १,२५४ कोटी रुपयांची वसुली करणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत ५७१ कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप ६८२ कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे. ही संपूर्ण रक्कम पुढील १० दिवसांत वसूल करण्याच्या स्पष्ट सूचना अग्रवाल यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.

वसुलीसोबतच वीजचोरांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्राहकसेवा, वीजपुरवठ्याची गुणवत्ता, वसुली आणि वीज गळती कमी करण्याच्या कामात ठोस परिणाम दिसला पाहिजे. केवळ नियोजन न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाले पाहिजेत, असे अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगरमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण उत्साहात

मधुसंचय गणपती मंदिरात ३०० महिलांचा सहभाग; ‘कुटुंब प्रबोधन आणि...

मुंबई कोस्टल रोडवर BMWचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, एक गंभीर

लोटस जेट्टीजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती; अपघाताच्या...