शनिवारवाड्यावर १६ ते १८ सप्टेंबर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम.

Date:

पुण्यात ‘राज्य सांस्कृतिक महोत्सवा’तून गणेशोत्सवाचा सांस्कृतिक जागर

पुणे (दि. १५) : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याच्या निमित्ताने प्रथमच यंदा पुणे शहरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे संयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने करीत आहेत.

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि लोककलेचा वारसा राज्यभर पोहोचविण्याच्या उद्देशाने १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शनिवारवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक श्री. प्रवीण तरडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. आमदार हेमंत रासने हे सार्वजनिक गणेशोत्सवातील सक्रिय कार्यकर्ते आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. गेल्यावर्षी पासून सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या काळात राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

१६ सप्टेंबर — ‘नादविष्कार’ :
सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा ‘नादविष्कार’ सादर केला जाणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या समृद्ध ढोल-ताशा परंपरेचा अनुभव शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत घेता येणार आहे. पुण्यातील नामांकित पारंपरिक ढोल-ताशा पथकांकडून भव्य वादन सादरीकरण करण्यात येणार आहे. ज्ञानप्रबोधनी पहिले हे शालेय विद्यार्थ्यांचे पथक, ‘स्व’रूपवर्धिनी पूर्व भागातील विद्यार्थ्यांचे पथक, तेजस्विनी हे महिलांचे झांज पथक, Say No To Drugs ची प्रतिज्ञा घेणारे शिवमुद्रा पथक यामध्ये असणार आहे.

१७ सप्टेंबर — ‘कणक — अक्षर अक्षर तुझेच आहे’ :
सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत विशेष काव्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य आणि कवितेच्या समृद्ध परंपरेला समर्पित या कार्यक्रमात ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या संकल्पनेतून परंपरा, आधुनिकता, शब्द, भावना आणि भक्तीचा संगम अनुभवता येणार आहे.

१८ सप्टेंबर — ‘Folk लोक’
‘Folk लोक महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष’ हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला, लोकसंगीत आणि लोकपरंपरांचा रंगमंचावर आविष्कार करण्यात येणार आहे.

‘गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब’ — हेमंत रासने

“पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, लोककला आणि कलावंतांना व्यापक व्यासपीठ मिळाले आहे.

पुणे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे मातृस्थान असून कसबा मतदारसंघाला या परंपरेचे विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्याचे आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव अनुभवता येणार आहे. पुणेकरांनी आणि गणेशभक्तांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन अडचणीत...

अतिदुर्गम सिरोंचा तालुक्याच्या आणखी दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तेलंगणामधून पर्यायी व्यवस्था

संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून वीजयंत्रणेच्या कामांचा आढावा  मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

“अमेरिकेने तर अंतराळातही केली शस्त्रे तैनात!” दिली कबुली

पृथ्वीच्या कक्षेत शस्त्रे तैनात,कोणती शस्त्रे, किती आणि कधी पाठवली...

“मद्यधुंद कार चालकाने केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील मोटारीला मारला कट”

संचेती पुलाजवळील प्रकार; नाना पेठेतील शुभम वनितविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांची...