गणपती दर्शनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा रिक्षाने प्रवास

Date:

मानाच्या पाचही गणपतींसह दगडूशेठ, भाऊ रंगारी गणपतीचे घेतले दर्शन

अडचणीत सापडलेल्या बळीराजाला साकडे

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, गणपती दर्शनासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत चंद्रकांतदादा पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मानाच्या गणपतींच्या दर्शनानंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती तसेच भाऊ रंगारी गणपतीचेही दर्शन घेतले.

गणपती दर्शनासाठी रिक्षाने प्रवास केल्याने त्यांच्या या साध्या आणि आगळ्या प्रवासाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. यावेळी त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

पुण्याच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक गणेशोत्सवाची भव्यता, उत्साह आणि भक्तिभाव अनुभवत चंद्रकांतदादा पाटील यांनी गणरायाकडे राज्याच्या प्रगतीसह नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, अडचणीत सापडलेल्या बळीराजासाठी गणरायाला साकडे घातले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकांच्या हस्ते महापौर बंगल्यातील श्रीगणरायाची आरती

पुणे, दि. १५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त...

शनिवारवाड्यावर १६ ते १८ सप्टेंबर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम.

पुण्यात ‘राज्य सांस्कृतिक महोत्सवा’तून गणेशोत्सवाचा सांस्कृतिक जागर पुणे (दि....

अतिदुर्गम सिरोंचा तालुक्याच्या आणखी दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तेलंगणामधून पर्यायी व्यवस्था

संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून वीजयंत्रणेच्या कामांचा आढावा  मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

“अमेरिकेने तर अंतराळातही केली शस्त्रे तैनात!” दिली कबुली

पृथ्वीच्या कक्षेत शस्त्रे तैनात,कोणती शस्त्रे, किती आणि कधी पाठवली...