‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

Date:

मुंबई, महावितरणच्या मानव संसाधन विभागाने गेल्या सव्वा वर्षात राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, धोरणात्मक निर्णय आणि कर्मचारी कल्याणाच्या योजनांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. ११) झाले.

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला संचालक अनुदीप दिघे (वित्त), धनंजय औंढेकर (संचालन),  योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन), कार्यकारी संचालक परेश भागवत (मानव संसाधन), मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी या पुस्तकाच्या शुभेच्छा संदेशामध्ये मानव संसाधन विभाग आणि अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या विविध उल्लेखनीय कामांचा गौरव केला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी मानव संसाधन विभागाला गेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी निर्णय आणि उपक्रमांच्या माध्यमातून लोकाभिमुख व कर्मचारीभिमुख चेहरा मिळवून दिला आहे.

शून्य विद्युत अपघातासाठी विविध उपाययोजना, विश्वविक्रमी विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान, महिला कर्मचारी सक्षमीकरण व सन्मान, अभियंते व जनमित्रांचा सन्मान, कर्मचारी संघटनांशी मासिक संवाद, कौटुंबिक स्नेहमेळावे, हरित ऊर्जेसाठी अर्थसाहाय्य, क्रीडा व नाट्यस्पर्धा, प्रशिक्षण व भरती प्रक्रिया, कर्मचारी कुटुंबांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या आर्थिक तरतूदीत वाढ आणि या सर्वांची अंमलबजावणी यावर हे पुस्तक आधारित आहे. उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत यांनी या पुस्तकाचे लेखन व संपादन केले आहे.

या कार्यक्रमाला विशेष कार्य अधिकारी व मुख्य अभियंता श्री. मंगेश कोहाट, मुख्य अभियंते सर्वश्री सुनील काकडे, दिपक कुमठेकर, राजेश नाईक, दत्तात्रेय बनसोडे, सुंदर लटपटे, चंद्रमणी मिश्रा, अरविंद बुलबुले, ज्ञानेश कुलकर्णी, अंकुर कावळे, पवनकुमार कच्छोट, पंकज तगलपल्लेवार, राजाराम माने, अनिल डोये यांच्यासह अधिकारी व अभियंते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक (मानव संसाधन) यांचे तांत्रिक सहायक डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुष्परथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष; हरिहर मंदिरात...

अलायन्स एअरच्या विमानाचे इंजिन हवेत निकामी; दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

दुसऱ्या इंजिनच्या साहाय्याने विमान सुरक्षित उतरले; क्रू मेंबर्ससह सर्व...