अलायन्स एअरच्या विमानाचे इंजिन हवेत निकामी; दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

Date:

दुसऱ्या इंजिनच्या साहाय्याने विमान सुरक्षित उतरले; क्रू मेंबर्ससह सर्व 40 जण सुरक्षित

नवी दिल्ली : प्रयागराजहून नवी दिल्लीकडे निघालेल्या अलायन्स एअरच्या विमानाचे एक इंजिन हवेतच निकामी झाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. पायलटने प्रसंगावधान राखत दुसऱ्या इंजिनच्या साहाय्याने विमान सुरक्षित उतरवले. विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व 40 जण सुरक्षित असल्याची माहिती आहे.

अलायन्स एअरचे फ्लाइट क्रमांक 9I-698 दुपारी 12.33 वाजता प्रयागराज येथून नवी दिल्लीसाठी रवाना झाले होते. विमान मेरठजवळ पोहोचल्यानंतर पायलटला एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) माहिती देत दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.

घटनेची माहिती मिळताच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली. टर्मिनल-1 च्या रनवे-4 वर आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आणि विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी सुमारे 30 मिनिटे धावपट्टी पूर्णपणे मोकळी ठेवण्यात आली. दुपारी 2.15 वाजता विमान सुरक्षित उतरले.

या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळी बिलासपूरहून प्रयागराजला पोहोचले होते विमान

माहितीनुसार, हेच विमान शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता बिलासपूरहून प्रयागराजकडे रवाना झाले होते. सकाळी 11.58 वाजता ते प्रयागराज विमानतळावर पोहोचले. काही वेळाच्या थांब्यानंतर दुपारी 12.33 वाजता दिल्लीसाठी विमानाने पुन्हा उड्डाण केले आणि त्यानंतर इंजिनमधील तांत्रिक बिघाड समोर आला.

दोन आठवड्यांत दुसरी गंभीर घटना

अलायन्स एअरच्या विमानाशी संबंधित ही दोन आठवड्यांतील दुसरी गंभीर घटना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी दिल्लीहून बिलासपूरला गेलेल्या फ्लाइट 9I-613 चे बिलासा देवी केवट विमानतळावर लँडिंग करताना डाव्या बाजूचे टायर फुटले होते.

टायर फुटल्यानंतर धावपट्टीवर घर्षणामुळे ठिणग्या उडाल्या होत्या. मात्र वैमानिकाने विमान सुरक्षितपणे थांबवले. त्या विमानात 37 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते आणि सर्वजण सुरक्षित राहिले होते.

अल्प कालावधीत घडलेल्या या दोन घटनांमुळे अलायन्स एअरच्या विमानांच्या तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दक्षिण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण; 95 वर्षांच्या प्रवासाला ऐतिहासिक टप्पा

5,068 किमी ब्रॉडगेज नेटवर्क पूर्णपणे विद्युत; पट्टुकोट्टई–कारैकुडीचा अंतिम 71...

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्ला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा...