महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत आत्महत्या प्रतिबंधक ‘गेटकीपर’ प्रशिक्षण; राज्यभरातून 190 जणांचा सहभाग

Date:

मानसिक तणावाची लवकर ओळख, संवेदनशील संवाद आणि योग्य मदतीसाठी ‘LISTEN’ प्रशिक्षणावर भर

पुणे : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2026 निमित्त महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे यांच्या वतीने एक दिवसीय आत्महत्या प्रतिबंधक गेटकीपर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती वाढविणे, भावनिक तणाव आणि आत्महत्येचा धोका लवकर ओळखणे तसेच गरजू व्यक्तींना योग्य वेळी मदतीशी जोडण्यासाठी सक्षम ‘गेटकीपर्स’ तयार करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संचालक-प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पवार, संस्थेतील प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी प्रमुख प्रशिक्षक तथा The Connect Hut चे संस्थापक संचालक सचिन चितांबरन यांचा परिचय करून दिला. मानसिक आरोग्यासारखे संवेदनशील विषय सर्वसामान्यांना सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत पोहोचविण्यासाठी ते कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रशिक्षणाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे 190 सहभागी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्य, भावनिक तणाव, आत्महत्येशी संबंधित जोखीम आणि संरक्षक घटक तसेच संकटातील व्यक्तीशी संवेदनशील पद्धतीने संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तीन प्रमुख घटकांवर प्रशिक्षण

पहिल्या सत्रात ‘मानसिक आरोग्य समजून घेणे’ या विषयांतर्गत मानसिक स्वास्थ्य, भावना, तणावाची लक्षणे, मानसिक आरोग्याच्या विविध पातळ्या, सुरक्षितता योजना, उपलब्ध सेवा आणि सामाजिक आधारव्यवस्थेचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली.

दुसऱ्या सत्रात आत्महत्या आणि Non-Suicidal Self-Injury (NSSI) यातील फरक, आत्महत्येची जोखीम वाढविणारे व कमी करणारे घटक, आत्महत्येच्या विचारांचे टप्पे, गैरसमज आणि वस्तुस्थिती तसेच मानसिक तणाव अनुभवणाऱ्या व्यक्तीशी योग्य संवाद कसा साधावा याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेल्या ‘LISTEN Suicide Prevention Gatekeeper Training’ मधून आत्महत्येचे विचार किंवा तीव्र भावनिक तणाव अनुभवणाऱ्या व्यक्तीला कसा प्रतिसाद द्यावा, तिचे म्हणणे कसे ऐकून घ्यावे आणि तिला योग्य व्यावसायिक मदतीशी कसे जोडावे यासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्ये दिली गेली.

प्रशिक्षण संवादात्मक पद्धतीने घेण्यात आले. चर्चासत्रे, प्रश्नोत्तर, चिंतन आणि प्रत्यक्ष सहभागाच्या माध्यमातून सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले. आत्महत्येबाबतचे गैरसमज दूर करणे, धोक्यात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशीलतेने संवाद साधणे, मानसिक तणावाची लवकर ओळख करणे आणि योग्य संदर्भसेवा उपलब्ध करून देणे यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तर, सहभागींचा अभिप्राय आणि समारोप सत्राने झाला. प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठी आवश्यक पूर्व व पश्चात मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.

डॉ. प्रफुल्ल कापसे यांनी सांगितले की, अशा प्रशिक्षणांद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, मानसिक तणावाची वेळेत ओळख करणे आणि महाराष्ट्रातील समुदायाधारित आत्महत्या प्रतिबंधक प्रयत्न अधिक सक्षम करणे हा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अलायन्स एअरच्या विमानाचे इंजिन हवेत निकामी; दिल्लीत आपत्कालीन लँडिंग

दुसऱ्या इंजिनच्या साहाय्याने विमान सुरक्षित उतरले; क्रू मेंबर्ससह सर्व...

दक्षिण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण; 95 वर्षांच्या प्रवासाला ऐतिहासिक टप्पा

5,068 किमी ब्रॉडगेज नेटवर्क पूर्णपणे विद्युत; पट्टुकोट्टई–कारैकुडीचा अंतिम 71...

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्ला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा...