पीएमपीएमएलच्या ‘प्रवासी दिना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; संचालक अजय खेडेकर यांचा प्रवाशांशी थेट संवाद

Date:

बससेवा, वेळापत्रक, मार्ग आणि सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचना स्वीकारल्या

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवासी दिना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनपा भवन मुख्य बसस्थानक येथे पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि तक्रारी जाणून घेतल्या.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या संकल्पनेतून प्रवाशांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, या उद्देशाने दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ आयोजित करण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत मनपा भवन मुख्य बसस्थानक येथे सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत प्रवासी दिन घेण्यात आला. यावेळी संचालक अजय खेडेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या लेखी तक्रारी आणि अर्ज स्वीकारले.

प्रवाशांनी बससेवेची वारंवारता, वेळापत्रक, विविध मार्ग, बसथांब्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांबाबत समस्या व सूचना मांडल्या. प्राप्त झालेल्या तक्रारींवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी आगारप्रमुख मदगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीएमपीएमएलच्या सर्व आगारांमध्येही प्रवासी दिनाचे आयोजन करण्यात आले. विविध आगारांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांकडून सूचना, समस्या आणि लेखी तक्रारी स्वीकारल्या.

प्रवासी हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भीमाशंकर ज्योतिर्लिंग परिसरात ‘स्वच्छता सप्ताह’; भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची विशेष स्वच्छता

सुमीत फॅसिलिटीजचा उपक्रम; दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा,...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आंतरविभागीय पुरुष ज्युडो स्पर्धा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील 42 ज्युडोपटूंचा...

पुण्यातील ‘4 बेस-4 टॉप’ धोरणावर पुणेकर मंचाचा आक्षेप

पुण्यातील 121 आणि पिंपरी-चिंचवडमधील 65 शांतता क्षेत्रांत कठोर अंमलबजावणीची...

आदर्श माता शेवराबाई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली; डॉ. नामदेव चव्हाण यांनी केले कुटुंबीयांचे सांत्वन

“त्यांच्या संस्कारातून समाजसेवेची पिढी घडली; लाखो पीडित कुटुंबांना न्याय...