सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आंतरविभागीय पुरुष ज्युडो स्पर्धा उत्साहात संपन्न

Date:

अहिल्यानगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील 42 ज्युडोपटूंचा सहभाग

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय पुरुष ज्युडो स्पर्धा 2026-27 दिनांक 9 आणि 10 सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत अहिल्यानगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्हा विभागातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.

स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर निकम, डॉ. गणेश पटारे, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक अमित गिरिगोसावी, विद्यापीठ प्रतिनिधी किशोर घडियार, दत्ता उतेकर तसेच निवड समिती सदस्य प्रा. ऋषिकेश वाघचौरे आणि योगेश धडावे उपस्थित होते.

स्पर्धेत विविध विभागांतील एकूण 42 ज्युडोपटूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी कौशल्य, शिस्त, चपळता आणि जिद्दीचे दर्शन घडवत रंगतदार सामने खेळले. खेळाडूंमधील स्पर्धात्मक भावना, क्रीडावृत्ती आणि आत्मविश्वासामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे ज्युडो असोसिएशनचे मुख्य पंच सेन्सई अनिल सकपाळ आणि सेन्सई सुधीर कोंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच प्रा. दशरथ गवित, सहाय्यक प्रा. रेणुका तलवार, प्रा. रेखा कटारमल, प्रा. शिवानी माळी आणि सौ. मोनाली कबदुले यांनी आयोजनात योगदान दिले.

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास करणे तसेच विद्यापीठ स्तरावरील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी खेळाडू, पंच, अधिकारी, आयोजक आणि स्वयंसेवकांचे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दक्षिण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण; 95 वर्षांच्या प्रवासाला ऐतिहासिक टप्पा

5,068 किमी ब्रॉडगेज नेटवर्क पूर्णपणे विद्युत; पट्टुकोट्टई–कारैकुडीचा अंतिम 71...

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्ला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा...

भीमाशंकर ज्योतिर्लिंग परिसरात ‘स्वच्छता सप्ताह’; भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची विशेष स्वच्छता

सुमीत फॅसिलिटीजचा उपक्रम; दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा,...