भीमाशंकर ज्योतिर्लिंग परिसरात ‘स्वच्छता सप्ताह’; भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची विशेष स्वच्छता

Date:

सुमीत फॅसिलिटीजचा उपक्रम; दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचे संकलन

पुणे,: श्रावण महिन्याच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सुमीत फॅसिलिटीजच्या वतीने पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात २ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबविण्यात आला. या मोहिमेत भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळासह मंदिर परिसर आणि नदीप्रवाहाची विशेष स्वच्छता करण्यात आली.

मोहिमेदरम्यान उगमस्थळी साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा आणि भाविकांकडून अर्पण करण्यात आलेले निर्माल्य काढण्यात आले. तसेच मंदिराकडे जाणारे रस्ते, परिसर, नाले आणि कचरा संकलनाच्या ठिकाणांचीही स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमासाठी २५ ते ३० सफाई कर्मचारी आणि ३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय स्वतंत्र देखरेख वाहन, कचरापेट्या, झाडू, कचऱ्याच्या पिशव्या आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (PPE किट्स) उपलब्ध करून देण्यात आली होती.

श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत होता. सुमीत फॅसिलिटीजच्या पथकाने दररोज ३० ते ३५ कचरापेट्यांमधील कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावली.

मुंबईतील जुहू आणि वरळी समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता उपक्रमानंतर सुमीत फॅसिलिटीजने भीमाशंकर तीर्थक्षेत्रातही ही मोहीम राबवली. महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे स्वच्छता आणि सार्वजनिक सेवेला चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनी सांगितले की, भीमाशंकर हे केवळ आध्यात्मिक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नसून याच ठिकाणाहून भीमा नदीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पवित्र स्थळासोबतच नदीच्या उगमाचे जतन आणि स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धा, पर्यावरण आणि समाजाप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धार्मिक स्थळांसोबतच नैसर्गिक वारशाचे संवर्धन आणि स्वच्छता याबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्ला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा...

पीएमपीएमएलच्या ‘प्रवासी दिना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; संचालक अजय खेडेकर यांचा प्रवाशांशी थेट संवाद

बससेवा, वेळापत्रक, मार्ग आणि सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचना...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आंतरविभागीय पुरुष ज्युडो स्पर्धा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील 42 ज्युडोपटूंचा...

पुण्यातील ‘4 बेस-4 टॉप’ धोरणावर पुणेकर मंचाचा आक्षेप

पुण्यातील 121 आणि पिंपरी-चिंचवडमधील 65 शांतता क्षेत्रांत कठोर अंमलबजावणीची...