पुणे महापालिकेच्या ९ रुग्णालयांचा होणार कायापालट; मॉड्युलर OT, ICU आणि लेबर रूमची सुविधा

Date:

बोपोडीतील संजय गांधी रुग्णालयात स्वतंत्र ICU; कमला नेहरू रुग्णालयातील NICU आणखी सक्षम होणार

पुणे : शहरातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नऊ प्रमुख सार्वजनिक रुग्णालये आणि प्रसूतिगृहांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (Modular OT), अतिदक्षता विभाग (ICU), आधुनिक लेबर रूम तसेच सुधारित वॉर्ड व्यवस्थापन प्रणाली उभारण्यात येणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कै. संजय गांधी दवाखाना-बोपोडी, भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय-येरवडा, कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना-धायरी, कै. काशीनाथ आमाजी धनकवडे प्रसूतिगृह-बालाजीनगर, कै. चंदूमामा सोनावणे रुग्णालय-भवानी पेठ, राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह-मित्रमंडळ चौक, कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह-कोथरूड, कै. सखाराम कुंडलिक कोरे प्रसूतिगृह-मुंढवा आणि कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतिगृह-बोपोडी या नऊ आरोग्य संस्थांचा या योजनेत समावेश आहे.

नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये अँटीस्टॅटिक फ्लोअरिंग, आधुनिक ओटी कंट्रोल पॅनल, विशेष सीलिंग फिल्ट्रेशन सिस्टीम, एलईडी डबल डोम ओटी लाईट, इलेक्ट्रॉनिक ओटी टेबल आणि सर्जन पेंडंट यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. रुग्णालयातील हवा स्वच्छ आणि जंतुरहित ठेवण्यासाठी आधुनिक HVAC प्रणाली, मध्यवर्ती वैद्यकीय गॅस पाईपलाईन, नर्स कॉल सिस्टीम, इलेक्ट्रिक सक्शन मशीन आणि डिजिटल फ्युमिगेशन यंत्रणाही बसवली जाणार आहे.

माता आणि नवजात बालकांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर देण्यात आला असून आधुनिक लेबर रूममध्ये दोन डिलिव्हरी टेबल युनिट्स, लेबर रूम पेंडंट, स्मार्ट IEC डिस्प्ले, एअर शॉवर आणि बायोमेडिकल वेस्ट बिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महिला वॉर्डचेही नूतनीकरण करून विनाइल फ्लोअरिंग, अँटीमायक्रोबियल व अँटीफंगल पेंटिंग, सुरक्षित अंतर्गत सजावट, एर्गोनॉमिक फर्निचर आणि स्वतंत्र स्टोरेज युनिट्सची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी इंटरनेट आधारित Advanced Integrated Ward Management System कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

बोपोडीच्या संजय गांधी रुग्णालयात स्वतंत्र ICU

बोपोडी येथील कै. संजय गांधी रुग्णालयात स्वतंत्र मॉड्युलर अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये १० मोटराइज्ड फाईव्ह फंक्शन ICU बेड्स, पेशंट सर्व्हेलन्स सिस्टीम, सेंट्रल मॉनिटरिंग स्टेशन, आधुनिक ECG मशीन, सिरिंज इन्फ्युजन पंप, डिफिब्रिलेटर, मल्टिपॅरामिटर मॉनिटर्स आणि विविध वयोगटातील रुग्णांसाठी उपयुक्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता महापालिका रुग्णालयातच उच्च दर्जाचे उपचार मिळण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

कमला नेहरू रुग्णालयाच्या NICU मध्ये १० व्हेंटिलेटर, १० CPAP मशीन

कमला नेहरू रुग्णालयातील Neonatal Intensive Care Unit (NICU) अधिक सक्षम करण्यासाठी १० अत्याधुनिक Neonatal Ventilators आणि १० CPAP Machines उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अकाली जन्मलेल्या किंवा गंभीर अवस्थेतील नवजात बालकांना तत्काळ श्वसन सहाय्य मिळाल्याने उपचार अधिक जलद उपलब्ध होतील. तसेच गंभीर नवजात बालकांना उपचारासाठी इतर रुग्णालयात पाठविण्याची गरज कमी होऊन स्थानिक पातळीवरच उपचार क्षमता वाढणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात शल्यरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, निओनेटोलॉजिस्ट, फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ आणि रेडिओलॉजिस्ट अशा सात संवर्गातील तज्ज्ञांची एकूण ३८ पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

HCMTR आणि इनर रिंग रोड प्रकल्पांना वेग; शासकीय जागांचे प्रस्ताव सादर, अलाइनमेंट अंतिम

बदललेल्या मार्गासाठी MRTP कलम 37 अंतर्गत तातडीने फेरबदल प्रक्रिया;...

गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ विसर्जन घाटांवर २४ तास सुरक्षा बंदोबस्त

९० जीवरक्षकांसह ३० जण राखीव; अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा...

गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

पुणे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....

गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी...