गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ विसर्जन घाटांवर २४ तास सुरक्षा बंदोबस्त

Date:

९० जीवरक्षकांसह ३० जण राखीव; अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा बंद, महापौरांकडून घाटांची पाहणी

पुणे : गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम हौद, रस्ते, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची तयारी केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहरातील विविध विसर्जन घाटांची पाहणी करून नागरिकांना आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापौर मंजुषा नागपुरे यांनी शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विसर्जन घाटांची पाहणी केली. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अलका चौक येथील विसर्जन व्यवस्था तसेच वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पांचाळेश्वर घाट आणि एस. एम. जोशी घाटाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित लोकप्रतिनिधी, उपायुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त, अभियंते आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. कोंढवा-उंड्री परिसरातील विसर्जन हौदांची तसेच हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गणेश मूर्ती विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांचीही अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, सुलभ शौचालयांची व्यवस्था, अतिरिक्त प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्ही देखरेख आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांना अडचणी आल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

१५ घाटांवर अग्निशमन दलाचा बंदोबस्त

गणेश विसर्जनाच्या वेळी नदीपात्रात दुर्घटना किंवा भाविक बुडण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमा परिसर, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा घाट, चिमा उद्यान येरवडा, दत्तवाडी घाट आणि वारजे स्मशानभूमी घाटाचा यामध्ये समावेश आहे.

या घाटांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे २४ तास सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नदीच्या पात्रात सुरक्षिततेसाठी आडवा दोरखंड बांधण्यात येणार असून, शक्यतो नागरिकांना खोल नदीपात्रात न उतरता महापालिकेने तयार केलेल्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

प्रत्येक घाटावर दुपारी १ ते रात्री ९ या कालावधीत अग्निशमन दलाचा एक फायरमन तैनात राहणार आहे. तिन्ही पाळ्यांमध्ये १५ घाटांसाठी एकूण ९० जीवरक्षकांची नियुक्ती केली जाणार असून मध्यवर्ती अग्निशमन केंद्रात ३० अतिरिक्त जीवरक्षक राखीव ठेवण्यात येणार आहेत. घाटांवर जादा दोरखंड, लाईफ जॅकेट आणि जीवरक्षकांना सहज ओळखता यावे यासाठी ट्रॅफिक व्हेस्ट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

गणेशोत्सवाच्या कालावधीत जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध राहावे म्हणून १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात येणार आहेत.

विद्युत सुरक्षेवर विशेष भर

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील पथदिव्यांच्या खांबांची तपासणी केली असून धोकादायक परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. गंजलेले किंवा धोकादायक खांब, तुटलेले जंक्शन बॉक्स, फिडर पिलर अथवा विद्युत धोक्याची परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृत वीजजोडणी न घेता महावितरणकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या अधिकृत वीजजोडणीचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पथदिव्यांच्या खांबांना अथवा विद्युत यंत्रणेला स्पर्श करू नये, विनापरवाना वीज घेऊ नये, खांबांवर फ्लेक्स किंवा होर्डिंग बांधू नयेत तसेच उघड्या भूमिगत केबल्सपासून दूर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सव काळात विसर्जन घाट आणि कृत्रिम विसर्जन हौदांवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सुलभतेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेच्या ९ रुग्णालयांचा होणार कायापालट; मॉड्युलर OT, ICU आणि लेबर रूमची सुविधा

बोपोडीतील संजय गांधी रुग्णालयात स्वतंत्र ICU; कमला नेहरू रुग्णालयातील...

गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

पुणे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....

गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी...

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न

चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या विकासाला गती; बहुतांश कामे सुरू राष्ट्रीय महामार्गावरील...