गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदम

Date:

पुणे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” या संकल्पनेला चालना देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” अभियानास बळकटी देण्यासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय यांच्यावतीने जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाग्यश्री पाटील, भाई प्रतिष्ठानचे डॉ. शंतनु जगदाळे, लखन वाघमारे, जिजाऊ फाऊंडेशनच्या ज्योती ढमाळ तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

युवकांमध्ये तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समन्वित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी पोस्टर अभियान, जनजागृती फलक, घोषवाक्ये, बॅनर्स तसेच “तंबाखूमुक्त पुणे – व्यसनमुक्त पुणे” या संदेशाचा व्यापक प्रसार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था व युवकांच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले.

या उपक्रमामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी ओळखपत्रे (Identity Cards) उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानुसार, जिल्हा रुग्णालयाकडून उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक व प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्रे प्रदान करण्यात येतील, असे बैठकीत ठरविण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेच्या ९ रुग्णालयांचा होणार कायापालट; मॉड्युलर OT, ICU आणि लेबर रूमची सुविधा

बोपोडीतील संजय गांधी रुग्णालयात स्वतंत्र ICU; कमला नेहरू रुग्णालयातील...

गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ विसर्जन घाटांवर २४ तास सुरक्षा बंदोबस्त

९० जीवरक्षकांसह ३० जण राखीव; अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा...

गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या खासगी...

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्न

चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या विकासाला गती; बहुतांश कामे सुरू राष्ट्रीय महामार्गावरील...