कात्रज कोंढवा रस्त्यावरील शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूने विरोधक संतप्त

Date:

पुणे- कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि आंदोलन केले. त्यांनी ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे,’ अशी मागणी केली. तसेच, महापौर मंजुषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली.

नगरसेवक अरविंद शिंदे यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले काम आणि प्रशासनाच्या भूमिकेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्यावर आतापर्यंत 21 जणांचा बळी गेला आहे, तरीही महावितरणचे खांब अजूनही हटवले नाहीत, असे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सुमारे 150 कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर टीका केली.

शिंदे यांनी पुढे म्हटले की, 60 कोटी रुपये खर्च करूनही चौकाचौकात वाहतूक वॉर्डन उपलब्ध नाहीत. प्रशासन कधी जबाबदारी घेणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. या रस्त्याच्या प्रश्नावर आतापर्यंत सात वेळा सर्वसाधारण सभेत चर्चा झाली आहे. तरीही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे ‘आणखी किती वेळा चर्चा करायची आणि हा प्रश्न कधी सुटणार?’ असा संताप व्यक्त करत शिंदे यांनी प्रश्न विचारला. महापौर आणि आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनीही रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले की, मी स्थायी समितीचा सभापती असताना हा रस्ता सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या या भूमिकेला विरोध झाला आणि माझ्यावर टीकाही झाली. मात्र, आज रस्ता अपूर्ण राहिल्याने नागरिकांचा जीव जात आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी कोंढवा परिसरातील डीपी रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधले. प्रशासनच राजकारण करत असल्याचा आरोप करत, हे प्रश्न नेमके कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

बांधकाम विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. ते म्हणाले की, एफएसआय आणि टीडीआरच्या माध्यमातून रस्त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे दहा जागामालक रोख स्वरूपात मोबदला मागत आहेत. त्यांचा प्रश्न येत्या दोन ते तीन आठवड्यांत सोडवण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम सहा ते सात महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज-कोंढवा रस्ता आणखी किती बळी घेणार ; मुख्यसभेत विरोधी पक्षनेते निलेश निकम आक्रमक

वारंवार होणाऱ्या अपघातांवरून प्रशासनाला जाब; रस्त्याचे रखडलेले काम आणि...

गणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्ती

पुणे: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांना आपल्या उत्सवांची व संस्कृतीची...

ट्रम्प म्हणाले- मध्यावधी निवडणुका जिंकल्यास प्रत्येक प्रौढाला 5000 डॉलर देतील

पुणे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले...