विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ रविवारी पुणे महापालिकेवर ‘डीजेमुक्ती’ मोर्चा

Date:

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांचे सोशल मीडियातून पुणेकरांना आवाहन; बालगंधर्व चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुण्यात या मुद्द्यावर नागरिक एकवटू लागले आहेत. बापट यांच्या समर्थनार्थ तसेच सार्वजनिक ठिकाणच्या ध्वनीप्रदूषणाविरोधात येत्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिकेवर ‘डीजेमुक्ती’ मोर्चा काढण्यात येणार आहे.

पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळ नागरिकांनी एकत्र यावे आणि तेथून पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी टिळक रोड परिसरात एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच नागरिकांच्या स्तरातून हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

डॉ. राहुल सावंत यांनी आपल्या व्हिडिओत बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या ध्वनीप्रदूषणविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. “बापट यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना पूर्ण पाठिंबा असेल,” अशी भूमिका सावंत यांनी मांडल्याचे वृत्त आहे.

डीजे अथवा कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हा विषय अधिक तीव्र झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आता रविवारी होणाऱ्या मोर्चाकडे लक्ष लागले असून, विद्यानंद बापट यांच्या समर्थनाबरोबरच ध्वनीप्रदूषणाविरोधात पुणेकरांची भूमिका मांडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्सवांची दहशत: “मी जिवंत असेन तर मोर्चात जाईन”; हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची ठाम भूमिका

“मी कोण आहे यापेक्षा माझा मुद्दा महत्त्वाचा”; ध्वनीप्रदूषणाला ‘सॉफ्ट...

सामाजिक रक्षाबंधनातून ‘आपण सारे एक’चा संदेश

महापौरांच्या निवासस्थानी रक्षा बंधनाचा अनोखा सोहळा पुणे : रक्षाबंधनाचा धागा...

श्रीनगर विमानतळावर इंडिगोचे विमान खांबाला धडकले

नवी मुंबईहून आलेल्या 6E 225 विमानातील सर्व प्रवासी व...

तरुणांनो सत्याचे जतन करा आणि लोकशाही मजबूत करा, म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

इएलसी 2.0 शाळा आणि महाविद्यालयांना बनवणार निवडणूक साक्षरतेची केंद्र गोवा- निवडणूक...