पुणे, दि. १: सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवीपेठ, पुणे-४११०३० येथे एक अशासकीय कर्मचारी माळी आणि मुलांचे वसतीगृह, पर्वती, पुणे- ४११००९ येथे एक अशासकीय पहारेकरी यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र माजी सैनिक व इतर नागरीक यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज संबंधित वसतिगृहामध्ये सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षिका भ्रमणध्वनी क्र. ७७७६८०५८२४ आणि वसतिगृह अधिक्षक भ्रमणध्वनी क्र. ७३००२३१०५० यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस फिरासत (नि.) यांनी केले आहे.

