दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य

Date:

पुणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर ज्वारी, ८० हेक्टरवर हरभरा प्रात्यक्षिक प्रकल्प

पुणे, दि. १७ : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक नियोजनासाठी प्रोत्साहन देण्यासह पिकांचे संवर्धन, चारा उत्पादन आणि पाण्याची बचत करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत जिल्ह्यात ३ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी आणि ८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.

ज्वारी, हरभरा पिकांसाठी निविष्ठा उपलब्ध
ज्वारीच्या प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेसाठी जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक कीटकनाशके आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच हरभरा पिकाच्या ८० हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठी बियाणे व इतर आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामात योग्य पिकांची निवड, पीक व्यवस्थापन आणि संवर्धनाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि शेतीशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन
पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकल्पासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सूक्ष्म सिंचनातून पाण्याची बचत
पाण्याचा कार्यक्षम वापर करून उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संचांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून आवश्यक निधी मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मुरघास निर्मितीसाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा साठवून ठेवता यावा, यासाठी मुरघास पद्धतीने चारा तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून, या माध्यमातून चारा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...

धरणातून १९.०५ टीएमसी पाणी सोडले; त्यातील ३ टीएमसी वाचवता, साठवता आले असते का? पाणी नियोजनावर सवाल!

खडकवासला धरणसाखळीत आता २५.४९ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षी याच...