पुण्यात वाहतूक नियोजनासाठी आता ‘रिअल टाइम’ डेटाचा आधार

Date:

पुणे : शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर अधिक परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा आधार घेणार आहे. विविध यंत्रणांकडून उपलब्ध होणारा वाहतूक व प्रवासविषयक डेटा एकत्र करून त्याआधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पथ विभागाने तयार केला आहे.

यासाठी पुणे अर्बन मोबिलिटी सेल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून, तीन वर्षांसाठी सल्लागार म्हणून ‘अर्न्स्ट अँड यंग एलएलपी’ची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या कामासाठी दरवर्षी २ कोटी ३७ लाख रुपये (करविरहित) खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. ढोले रस्ता परिसरात प्रस्तावित या कक्षात महापालिकेची सुमारे दहा जणांची टीम तसेच एससीएमटीआरची टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती अध्यक्ष भिमाले यांनी दिली.

टॉम टॉम , दूरसंचार कंपन्यांकडील प्रवासविषयक माहिती, सीसीटीव्ही, महाप्रीत, पुणे अर्बन अॅप, रोड मित्र, जीपीएस आधारित सार्वजनिक वाहतूक, वाहनतळ व्यवस्था आणि नागरिक तक्रार निवारण प्रणालीतील माहिती एकत्र केली जाणार आहे. त्यासोबतच रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (RAMS)
, जीआयएस, रस्ता बांधकाम व्यवस्थापन प्रणाली आणि ट्रेंचिंग पोर्टलमधील माहितीही एकत्रित केली जाणार आहे.

या सर्व माहितीच्या आधारे एकात्मिक वाहतूक नियोजन व व्यवस्थापन मंच विकसित करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे, वारंवार अडथळे निर्माण होणारे मार्ग आणि अपघातप्रवण क्षेत्रे ओळखून त्यावर तत्काळ उपाययोजना करणे शक्य होईल. सिग्नल समन्वय, मार्ग नियोजन, वाहनतळ व्यवस्थापन, चौकांची पुनर्रचना तसेच पदपथ आणि सायकल मार्गांच्या विकासालाही या माहितीचा आधार मिळणार आहे.

विशेष म्हणजे, वाहतूक कोंडीचा संबंध खड्डे, रस्त्यांची खराब अवस्था, सेवा वाहिन्यांसाठी केलेले खोदकाम आणि नागरिकांच्या तक्रारींशी जोडून समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेतला जाणार आहे. उपाययोजना करण्यापूर्वी आणि त्यानंतर वाहतुकीवर झालेला परिणामही मोजला जाणार आहे.

‘रिअल टाइम’ डेटाच्या आधारे फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर आणि अन्य वाहतूक प्रकल्पांची आवश्यकता निश्चित करण्यास मदत होईल. त्यामुळे केवळ कोंडी झाल्यानंतर उपाय करण्याऐवजी भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यावर भर राहणार आहे.

दरम्यान, RAMS प्रणालीचा अन्य डिजिटल डेटाबेसशी समन्वय केल्यास मर्यादित निधी कोणत्या रस्त्यांवर प्रथम खर्च करावा, कोणते रस्ते मजबूत किंवा पुनर्बांधणी करावेत आणि भविष्यातील देखभालीसाठी किती निधी लागेल, याबाबत निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

‘रिअल टाइम’ डेटातून काय साध्य होणार?

१. विविध स्रोतांतील वाहतूक व प्रवासविषयक माहिती एकाच मंचावर आणता येणार.

२. वाहतूक कोंडीची ठिकाणे, अडथळे आणि अपघातप्रवण क्षेत्रे अचूकपणे ओळखता येणार.

३. सिग्नल समन्वय, मार्ग नियोजन आणि वाहनतळ व्यवस्थापनात सुधारणा करता येणार.

४. खड्डे, रस्ते खोदकाम आणि वाहतूक कोंडी यांचा परस्परसंबंध तपासता येणार.

५. चौक पुनर्रचना, पदपथ, सायकल मार्ग आणि रस्ता दुरुस्तीला प्राधान्य देता येणार.

६. उपाययोजनांचा अंमलबजावणीपूर्वी आणि नंतरचा परिणाम मोजता येणार.

७. वाहतूक व्यवस्थापन प्रतिक्रियात्मक न ठेवता पूर्वानुमानाधारित करता येणार.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डेंग्यू–चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कर्मचारी तातडीने नियुक्त करा : भिमाले

रुग्णवाढीच्या भागांत प्राधान्याने मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश पुणे : शहरातील...

समाविष्ट गावांतील कर आकारणीचे विशेष ऑडिट करा

पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये १...