“लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता तर घ्यावीच लागेल” — पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Date:

गणेशोत्सवातील साऊंडबाबत पुणे पोलिसांची भूमिका स्पष्ट; प्लाझ्मा आणि प्रेशर मीडला पूर्ण बंदी, मान्य ध्वनिमर्यादेचे पालन बंधनकारक

पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा, मात्र त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मांडली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी ध्वनिप्रदूषण, साऊंड सिस्टीम आणि मिरवणुकांमधील आवाजाच्या मर्यादेबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

“उत्सव साजरा करण्याला आमचा विरोध नाही; मात्र लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता तर घ्यावीच लागेल,” असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या प्लाझ्मा स्पीकर आणि प्रेशर मीड साऊंड सिस्टीमवर शंभर टक्के बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पोलिसांनी केलेल्या प्रत्यक्ष साऊंड चाचण्यांमध्ये या उपकरणांमुळे अत्यंत उच्च ध्वनिपातळी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

डीजे किंवा इतर ध्वनिवर्धकांचा वापर करताना शासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. मान्य मर्यादा ओलांडल्यास संबंधित साऊंड सिस्टीमवर कारवाई केली जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार संपूर्ण यंत्रणाही जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वी विविध प्रकारच्या साऊंड सिस्टीमची प्रत्यक्ष चाचणी घेतली होती. त्यामध्ये बेस, टॉप, प्रेशर मीडसह विविध उपकरणांमुळे निर्माण होणारी ध्वनिपातळी डेसिबल मीटरद्वारे तपासण्यात आली. त्यानंतरच अत्याधिक आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांबाबत कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

गणेश मंडळे आणि विविध घटकांशी चर्चा सुरू असून विसर्जन मिरवणुकीतील साऊंडची रचना तसेच ढोल-ताशा पथकांच्या संख्येबाबतही नियमांच्या चौकटीत विचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सव ही पुण्याची मोठी सांस्कृतिक परंपरा असून तो उत्साहात आणि आनंदात साजरा व्हावा, अशीच पोलिसांची भूमिका आहे. मात्र उत्सव साजरा करताना सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था यांचाही विचार करावा लागेल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात “उत्सवावर निर्बंध नाहीत; पण कर्णकर्कश आवाजाला मुभा नाही” अशी पुणे पोलिसांची भूमिका स्पष्ट झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला...