गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची २४ तासांत पाहणी करा; कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही – आशिष शेलार

Date:

‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेनंतर प्रशासनाला निर्देश; मृत गणेशसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई, दि. २३ : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गणेशमूर्ती आगमनाच्या सर्व मार्गांची पुढील २४ तासांत पाहणी करून रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासकीय पातळीवर कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधिताला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भुलेश्वरचा राजा गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशसेवकांच्या कुटुंबीयांची शेलार यांनी रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

या दुर्घटनेचे नेमके कारण आणि त्यासाठी जबाबदार कोण, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. चौकशीतून सर्व बाबी समोर येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॉली, तिच्या चाकांची रचना, लोखंडी भाग तसेच वाहतुकीदरम्यान निर्माण होणाऱ्या कंपनांबाबत गणेश मंडळांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे गणेश मंडळे आणि भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही शेलार यांनी केले.

२४ तासांत आगमन मार्गांची पाहणी

“काल रात्री मी मुंबई महापालिका आयुक्तांशी स्वतः बोललो. मुंबईतील गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची स्थिती तातडीने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील २४ तासांत या मार्गांवरील रस्त्यांची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी,” असे शेलार यांनी सांगितले.

महापालिकेने यापूर्वीही विविध बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या असल्या तरी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना पुन्हा निर्देश देण्यात आले आहेत. “प्रशासकीय व्यवस्थेत कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे शेलार यांनी स्पष्ट केले.

मृत गणेशसेवकांना श्रद्धांजली

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दुर्घटनेत दोन गणेशसेवकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत जखमी गणेशसेवक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना शेलार यांनी केली.

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येणार असून जखमींवरील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांना आवश्यक मदत व आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेलार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संजय नहार एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी

पुणे : सरदह, पुणेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्ठी...

मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

जखमींमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुली; भुलेश्वरमधील आगमन...

चाकणमधील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर ‘ऑन फिल्ड’; १० एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे कार्यान्वित पुणे, दि. २३ ऑगस्ट २०२६ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. वाढत्या औद्योगिक वीजभाराचा विचार करून त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई येथील केंद्राचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर ३३/२२ केव्ही भांबोली उपकेंद्रात अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करून औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला. २२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे.  तसेच, ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त ‘फिडर बे’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली. तर २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.