बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी केले जेरबंदएक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

Date:

पुणे : बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात बाणेर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन पितळी जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.बाणेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल इंगळे यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पाटीलनगर, बालेवाडी येथील मोकळ्या जागेत एक इसम त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र घेऊन येणार आहे. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी रवाना झाले.पोलिसांनी नमूद ठिकाणी एका इसमाची संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन त्याला पाटील वस्ती, बालेवाडी, पुणे येथील मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव ओंकार बाबासाहेब जाधव, वय २० वर्षे, रा. पारखे वस्ती, सुसगाव, पुणे असे सांगितले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक सिल्वर रंगाचे पिस्तूल आणि त्या पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये दोन पितळी जिवंत काडतुसे मिळून आली.सदर अग्निशस्त्र कोठून आणले याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता ते त्याचा मित्र नृसिंह बिडवे, रा. पारखे वस्ती, सुसगाव, पुणे याच्याकडून घेतले असल्याचे त्याने सांगितले.त्यानंतर नृसिंह रामचंद्र बिडवे याचा शोध घेण्यासाठी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार रवाना झाले. नृसिंह बिडवे हा एव्हनव्हिस्टा सोसायटीजवळ, बालेवाडी, पुणे येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी एव्हनव्हिस्टा सोसायटीजवळ, बालेवाडी येथे सापळा रचला.काही वेळाने नृसिंह बिडवे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव नृसिंह रामचंद्र बिडवे, वय २५ वर्षे, रा. पारखे वस्ती, सुसगाव, पुणे असे सांगितले.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी क्र. ०१ याच्याकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि त्यामध्ये दोन पितळी जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ पुणे शहर चुलमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग ब्रह्मदेव गावडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिळारे, तसेच पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किशन शिंगे, संदेश निकाळजे, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गणेश भोंडवे, गजानन अवतारिक, स्वप्निल मराठे आणि समीर पवार यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनातून युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत

पुणे : देशभक्तीपर गीतांचे सूर, हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाईट्सचा...

महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता ‘मनुस्मृती’तून आली, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी

स्रियांना समाजात प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर, प्रगती आड...