आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावर 31 ऑक्टोबरनंतर खोदाईला बंदी; पुढील 5 वर्षेही परवानगी नाही

Date:

पुणे, 12 ऑक्टोबर : जानेवारी 2027 मध्ये पुणे शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. सायकल स्पर्धेच्या मार्गावर विविध सेवा वाहिन्यांसाठी सुरू असलेली खोदाई 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर कोणत्याही खात्याला या मार्गावर खोदाईची परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नव्हे तर रस्त्यांची गुणवत्ता कायम राहावी यासाठी संबंधित मार्गावर पुढील पाच वर्षे कोणतीही खोदाई करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी सोमवारी, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता पथ विभाग तसेच एम.एन.जी.एल., दिनेश इंजिनिअरिंग आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. सायकल स्पर्धेच्या मार्गावर विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

दिवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खोदाईसाठी प्रस्तावित अलाइनमेंटची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे निर्देश दिले. शक्य असल्यास खोदाई अॅडग्रेडमधून करावी किंवा स्पर्धेच्या मार्गाची LHS अथवा RHS बाजू टाळून विरुद्ध बाजूने केबल टाकण्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सायकल स्पर्धेच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, अशा पर्यायी अलाइनमेंटचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कामाला गती देण्यासाठी संबंधित कंपन्यांनी टीमची संख्या वाढवावी, तसेच खोदाईनंतर रस्त्यांची पुनर्स्थापना कशी करायची याचे नियोजन तातडीने करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. पथ विभागाच्या संबंधित अभियंत्यांनी अर्जदार कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आजच संयुक्त जागा पाहणी करून 13 ऑक्टोबरच्या बैठकीत नियोजन सादर करावे, असे निर्देश देण्यात आले.

महापालिकेने स्पष्ट केले की, अपवादात्मक परिस्थितीतच खोदाईसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली जाईल. त्यानंतर सायकल स्पर्धा मार्गावर कोणतेही खोदकाम करता येणार नाही. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास त्यामुळे होणारे नुकसान, अडचणी किंवा इतर प्रश्नांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदार कंपनीवर राहणार आहे.

रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होऊन ती DLP कालावधीपर्यंत सुस्थितीत राहावीत, यासाठी पुढील पाच वर्षे पुन्हा खोदाई होऊ नये, यावरही बैठकीत भर देण्यात आला. भविष्यातील गरज लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी कंपन्यांमार्फत क्रॉस डक्ट टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेला स्वतः डक्ट टाकणे शक्य असल्यास भविष्यात अतिरिक्त केबलसाठी पुन्हा रस्ता खोदावा लागू नये म्हणून अधिक क्षमतेचा मोठ्या आकाराचा डक्ट टाकण्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचेही निर्देश देण्यात आले.

स्पर्धेनंतर या मार्गावर पुन्हा खोदाई करण्याची गरज निर्माण झाल्यास ती सरळ मंजूर केली जाणार नाही. अशा कामांसाठी दंडात्मक आकारणी करूनच परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांच्या स्तरावर घेतला जाईल. खोदाईमुळे रस्त्याची गुणवत्ता खराब झाली किंवा नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंपनीविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि गंभीर प्रकरणात फौजदारी कारवाईदेखील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खोदाई झालेल्या रस्त्यांची पुनर्स्थापना पथ विभागामार्फत करण्यात येईल, असेही दिवटे यांनी स्पष्ट केले. यासोबतच खोदाईसंदर्भातील SOPचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले.

बैठकीस मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, अधीक्षक अभियंता अजय वायसे, एम.एन.जी.एल. आणि दिनेश इंजिनिअरिंगच्या प्रतिनिधींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात झालेली घट...

दादांच्या नंतर ‘सोमेश्वर’वर वहिनींची सत्ता; सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची एकतर्फी घोडदौड

बारामती, 12 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर...

2 किलो 200 ग्रॅम सोन्याची चोरी; खडक पोलिसांनी 12 तासांत दोघांना जेरबंद

पुणे : रविवार पेठेतील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या व्यावसायिकाच्या...