वैयक्तिक वादातून प्रभाग निधी न देणे हे तर जनविरोधी धोरण. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीबाबत न्यायपूर्ण मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची गरज!

Date:

पुणे- वैयक्तिक वादातून प्रभाग निधी न देणे हे तर जनविरोधी धोरण असून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधीबाबत न्यायपूर्ण मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे . ते म्हणाले ,’ सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात अधिक निधी आणि विरोधकांच्या प्रभागात निधीचा दुष्काळ अशा पद्धतीचे धोरण गेले अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांकडून वापरले जाते, तेही चुकीचेच आहे. परंतु आता त्याचा कहर म्हणजे एखाद्या प्रभागातील निधी शून्य करणे हे आहे. नगरसेवक हा त्या त्या प्रभागातील लोकांचा प्रतिनिधी असतो आणि शहरातील सर्वच नागरिकांच्या विकासाच्या संदर्भात आकांक्षा असतात त्याचे प्रतिनिधित्व करणे ही त्या नगरसेवकाची जबाबदारी असते.

परंतु गेल्या काही वर्षात सातत्याने ही विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी खेळी खेळली जाते. विरोधक खासदार आमदारांच्या बाबतीत ईडी,सीबीआय यांचा वापर हे जसे दबावाचे धोरण आहे तसेच स्थानिक पातळीवर नगरसेवकांना निधी न देऊन आडमुठेपणा करत त्यांना झुकायला लावण्याचे धोरण हे पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे. मतदारसंघासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी थेट पक्ष बदलणारे आमदार खासदार महाराष्ट्राने पाहिले आहेत.पुणे शहरात तर राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजप सत्ताधाऱ्यांसोबत मित्रपक्ष म्हणून काम करीत आहे. असे असताना वैयक्तिक वादातून जर जनतेवर अन्याय होणार असेल तर हा पायंडा घातक असून मनमानीपणाचा आणि मतदारांचा अपमान करणारा आहे.बहुमताच्या आधारे असा निर्णय घेणे हे सुद्धा अयोग्य असून आर्थिक निधी बाबत मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची गरज आहे.

,

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“नवा रस्ता, पुन्हा खोदकाम ! कात्रज–कोंढवा रस्त्याखालील जलवाहिनीला गळती”

“१०१६ मि.मी. व्यासाची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी २ x २...

राहुल गांधींच्या ठिय्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर केला FIR दाखल

जंतर-मंतर आंदोलनातील कथित पॅलेट गन प्रकरण; गुन्हा ‘अज्ञात व्यक्तीं’विरुद्ध...

मराठी न येणाऱ्या १,२६८ रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस; परिवहन विभागाची राज्यभर विशेष मोहीम

८,२१७ चालकांची तपासणी; मुंबई महानगर प्रदेशात ६०४, तर राज्याच्या...

‘एमएच १२’ ही पुण्याची ओळख कायम राहणार

वाहनांसाठी लवकरच नवी सिरीज ​पुणे: पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच...