महिला आणि तरुणांचे पुरस्कर्ते, दुरदृष्टीचे नेते राजीव गांधींच्या विचारांची देशाला गरज – बी. संदीप

Date:

‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे जयंती साजरी..!”

पुणे, (प्रतिनिधी) _ भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वतंत्र झाल्यानंतरही काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे. देशाच्या प्रगतीचा ज्याप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाया घातला त्यावर पुढे ‘आधुनिक क्रांतीचा’ पाया स्वर्गीय राजीव गांधी यांनी घातला. राजीव गांधी यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यांच्या सकारात्मक आणि विकसनशील विचारांची आजही देशाला गरज आहे, असे मत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्राचे सह प्रभारी, बी संदीप यांनी व्यक्त केले.
राजीव गांधी स्मारक समिती तर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालया समोरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अ भा काँग्रेस महासमितीचे सेक्रेटरी व महाराष्ट्राचे सह प्रभारी श्री बी संदीप बोलत होते. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
बी संदीप पुढे म्हणाले, संगणक क्रांतीचा पाया घालून राजीव गांधी यांनी आजच्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून दिले. राजीव गांधी यांचे योगदान आणि देशासाठी त्यांचे असणारे बलिदान आजच्या तरुण पिढीला माहिती करून दिले पाहिजे.
अ भा काँग्रेसच्या सचिव रेहाना चिस्ती आपल्या भाषणात म्हणाल्या, राजीव गांधी यांच्या सकारात्मक राजकारणामुळे संगणक क्रांतीचा जन्म झाला. राजीव गांधींचे विचार युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना राजकारणामध्ये आणले पाहिजे. त्यांचे विचार आजही देशाला मार्गदर्शक आहेत.
पुणे शहर काँग्रेस’ पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, दीप्ती चवधरी म्हणाल्या, गोपाळदादा तिवारी यांनी राजीव गांधी यांचा पुतळा बसविण्यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य आहे. राजीव गांधी यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. राजीव गांधी यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे नाही. त्यांना मिळालेल्या पंतप्रधान पदाच्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी मोठे काम केले. त्यामुळेच संगणक आणि तंत्रज्ञान क्रांती घडू शकली. राजकारणामध्ये भाजपच्या नकारात्मक घुसखोरी राजकारणामुळे जे वातावरण निर्माण झाले आहे त्याला सकारात्मक दृष्टीने बदलण्यासाठी राजीव गांधी यांच्या विचारांची गरज आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, सरचिटणीस राजेंद्र शेलार, समितीचे भोला वांजळे, संजय वावले इ नी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उद्यान अघिक्षक राजकुमार जाधव, स्मारक समितीचे पदाधीकारी, सदस्य, जेष्ठ काँग्रेसजन सर्वंश्री सुर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, नंदकुमार पापळ, कामगार नेते राजेंद्र खराडे, संजय अभंग, विवेक भरगुडे, सुभाष जेधे, लक्ष्मण तरवडे, अण्णा गोसावी, किशोर मारणे , भगवान कडू, धनंजय भिलारे, अण्णा गोसावी , ऍड श्रीकांत पाटील ,महेश अंबिके, गणेश मोरे, गणेश शिंदे, ऍड स्वप्निल जगताप, विकास दवे, नरसिंह आंबोली, राजेंद्र मगर ,एडवोकेट ऍड फैयाज शेख ,हरिदास अडसूळ, अविनाश अडसूळ , राजेंद्र सुतार , बाळासाहेब पवार उदय लेले, गणेश गुगळे आदि यावेळी उपस्थित होते.
सुभाष थोरवे यांनी आभार प्रदर्शन करून, राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये लवकरच २ हजाराहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती

पुणे, दि. २०: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा!

लोणावळा येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती! पुणे दि....