धर्मस्वातंत्र्य कायदा लागू हाेण्यापूर्वीच पुण्यात गुन्हे दाखल झाल्याचे उघड:28 ऑगस्टला अमलात येणार, पण 7 ऑगस्टलाच गुन्हे दाखल

Date:

पुणे-महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा १७ ऑगस्टला मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, पुणे पोलिसांनी या कायद्यानुसार ७ ऑगस्ट रोजीच खडक आणि हडपसर पोलिस ठाण्यात राज्यातील पहिला गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले. त्याचा फायदा आरोपींना होण्याची शक्यता विधिज्ञांनी व्यक्त केली आहे. रिक्षाचालक अमित भोसले (रा. भवानी पेठ, पुणे) यांनी तक्रार केली.

त्यात म्हटले होते की, ७ ऑगस्ट रोजी चर्चच्या वर्धापनदिनानिमित्ताने ब्रिटिश नागरिक पंकज देवनूरने (मु.रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई, सातारा) पुण्यात लबाडीच्या इराद्याने धर्मांतराचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ चे कलम ३ (१), (डी), (३) (५) (८) नुसार गुन्हा दाखल झाला. देवनूरचे वकिल विजय ठोंबरे पाटील म्हणाले की, आम्ही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला. परंतु अस्तित्वात नसलेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले म्हणाले, उपलब्ध कायद्याप्रमाणे कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यावर राज्यपालांच्या सहीने अधिसूचना नंतर निघाली. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम कायदा कलम वगळले गेल्यासआरोपीला थोडाफार फायदा होऊ शकेल. न्यायालयाची नोटीस आल्यास पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार स्पष्टीकरण दिले जाईल.

पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करतेवेळी शासनाचे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यासंदर्भात अधिसूचना आलेली होती. मात्र, ती कधीपासून लागू होणार याबाबत स्पष्टता नव्हती. नुकत्याच जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार २८ ऑगस्टपासून हा कायदा लागू होणार आहे. त्यामुळे यापूर्वी दोन गुन्ह्यांत लावण्यात आलेले कलम वगळण्यात येईल आणि इतर कलमांनुसार कारवाई पुढे सुरू राहील.

या घटनेने एफआयआरच्या वैधतेवर गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. नवीन कायदा लागू करण्यापूर्वी त्यातील तरतुदी व इतर महत्त्वाच्या कायदेशीर बाबी याबाबत तपासी अधिकाऱ्यांना योग्य कायदेशीर प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. – ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर -तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर...

उत्तर भारतात पावसाचा कहर; प्रयागराज जलमय, हिमाचल-उत्तराखंडमध्ये ६ मृत्यू

ओडिशात ९ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित; सहा जिल्ह्यांसाठी...

राँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसह वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या वाढवून दिवाळीपर्यंत कृती...