महिला प्रवाशांसाठी सुरक्षित एस.टी. सेवेकडे महत्त्वपूर्ण पाऊल : सात दिवसांत अहवाल देण्याचे प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Date:

महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्था व वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांना आश्वासन

मुंबई, दि. १७ ऑगस्ट २०२६ : राज्यातील एस.टी. बसस्थानके आणि एस.टी. प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित व सुविधायुक्त करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा व आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभाग व एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाला दिले आहेत.

विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले. महिला प्रतिनिधींनी राज्यातील २० जिल्ह्यांमधील ८७ बसस्थानकांची पाहणी केली असून स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा रक्षक, पोलीस गस्त, सीसीटीव्ही आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सर्व प्रमुख बसस्थानकांचे महिला सुरक्षा ऑडिट करणे, चालक-वाहक व सुरक्षा कर्मचाऱ्यांना लिंगसंवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे, छळाच्या घटनांमध्ये तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्पष्ट SOP तयार करणे, हेल्पलाईन व तक्रार यंत्रणेची माहिती प्रदर्शित करणे आणि विभागीय स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. अक्षरा सेंटरच्या सह-संचालिका डॉ. नंदिता शहा यांनी सार्वजनिक वाहतुकीतील महिला सुरक्षेबाबत केलेल्या कामाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

महिला प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिवहन विभाग आणि एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष आढावा बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच, पुण्यातील परिवहन व प्रवासी सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी केलेल्या तत्पर कार्यवाहीबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.

“सुरक्षित प्रवास हा महिला प्रवाशांचा अधिकार आहे. सर्व संबंधित विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा राबविल्यास राज्यातील एस.टी. सेवा अधिक सुरक्षित व प्रवासीस्नेही होईल,” असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्तर भारतात पावसाचा कहर; प्रयागराज जलमय, हिमाचल-उत्तराखंडमध्ये ६ मृत्यू

ओडिशात ९ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित; सहा जिल्ह्यांसाठी...

राँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसह वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या वाढवून दिवाळीपर्यंत कृती...

भोंदूगिरी व अंधश्रद्धाजन्य गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा राबवा : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

उदगीरमधील संशयित आंतरराज्यीय बाल तस्करीचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी पोलीस...

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार परताव्याचा लाभ

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार सीओईपी...