“पुणेकरांनो, आज पाण्यासाठी चालूया, उद्याची पिढी जलसुरक्षित करूया; २१ ऑगस्टच्या ‘महा पदयात्रेत’ सहभागी व्हा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी”

Date:

पुणे, दि. १४ : “पुणेकरांनो, आपल्या मुलांच्या आणि पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आज आपण पाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी, मातीचे संवर्धन करण्यासाठी आणि जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा पदयात्रेत – पाण्यासाठी’ मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणेकरांना केले आहे.

जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने जलसंधारण दिनानिमित्त दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत ‘महा पदयात्रा – पाण्यासाठी’ आयोजित करण्यात आली आहे. पोलिस परेड ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे.

‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ ही या पदयात्रेची संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

“आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा उद्याच्या पिढीसाठीची आपली मोठी गुंतवणूक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या जीवनाचा आणि भविष्यातील विकासाचा आधार आहे. त्यामुळे जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारणे आवश्यक आहे,” असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

युवक, विद्यार्थी, महिला, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत विविध घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. पदयात्रेत सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.

“चला, पाण्यासाठी एकत्र चालूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी जलसुरक्षित भविष्य घडवूया,” असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

या पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सोबत दिलेला क्यूआर कोड क्लिक करून आपली नोंद करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत...

पुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही—...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पाच जणांकडून ४ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे जप्त

सहकारनगर परिसरात युनिट-२ची कारवाई; सुमारे १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे...